संरक्षण मंत्रालयाचे आर. गोपाल यांची मुक्त विद्यापीठास भेट
नाशिक, दि. 04, नोव्हेंबर - संरक्षण मंत्रालयाच्या बळ नियोजन व सुविधाचे लेफ्टनंट जनरल आर. गोपाल यांनी नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठास सदिच्छा भेट दिली. यावेळी कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी त्यांचे स्वागत केले.
लष्करी जवानांना निवृत्तीनंतरही समाजात ताठ मानेने जगता यावे, या उद्देशाने त्यांच्यासाठी नोकरीच्या जागीच उच्चशिक्षणाची प्रकाशवाट खुली करून देण्यात आली आहे. यासंदर्भात अलीकडेच संरक्षण मंत्रालय आणि मुक्त विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्रालयाच्या मनुष्यबळ नियोजन व सुविधाचे लेफ्टनंट जनरल आर. गोपाल यांनी काल मुक्त विद्यापीठास सदिच्छा भेट देऊन विद्यापीठाच्या विविध उपक्रमांविषयी जाणून घेतले. या भेटीत त्यांनी विद्यापीठ परिसरातील यशवंतराव चव्हाण यांचे वस्तुसंग्रहालय, ग्रंथालय व माहितीस्रोत केंद्र, कृषी प्रक्षेत्रास भेट दिली.