Breaking News

जैन इरिगेशन संघ कॅरम स्पर्धेत उपविजेता; आयशा मोहंमदची भारतीय संघात निवड

जळगाव, दि. 10, नोव्हेबर - चेन्नई येथे नुकत्याच झालेल्या आंतरराज्य कॅरम स्पर्धेत जैन इरिगेशनच्या खेळाडूंनी घवघवीत यश मिळवले. पुरुष सांघिक गटात दुसरे उपविजेतेपद,  महिला एकेरीत आयशा मोहंमदने चौथे स्थान तर पुरुष एकेरीत पंकज पवारने पाचवे स्थान पटकावले. तसेच मनु बारीया व सलीम अन्सारी यांनीही यश संपादन केले. आयशा  मोहंमद हिची इंडो मालदीव कसोटी शृंखलेसाठीही निवड करण्यात आली आहे.