Breaking News

नान्नज बसस्थानकची अवस्था असून अडचण नसून खोळंबा

अहमदनगर, दि. 06, नोव्हेंबर - तालुक्यातील नान्नज येथे गेल्या कित्येक वर्षा पासून नान्नजच्या बसस्थानकची भिंतीची पूर्ण पणे पडझड झालेली आहे.  त्याच्या वरच्या पत्राचा छतपण पडायला झाले आहे नान्नज चे बसस्थानक कुजलेल्या लाकडावर उभे आहे त्याला कोणी वाली आहे का नाही? असा प्रश्‍न गंभीर पडला आहे नान्नज बसस्थानक असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था गावची झाली आहे. 
बसस्थानक मध्ये कोण प्रवासी व विद्यार्थी कधी आत मध्ये बसले तर अचानक पणे कधीही अंगावर पडेल? येवढी बिकट परिस्थिति नान्नच्या बसस्थानक ची झालेली आहे एखादा प्रवासी किंवा विद्यार्थी आत मध्ये बसल्यानंतर त्याच्या अंगावर वरचा छत पडल्यानंतर शासन दखल घेईल का? असा सवाल प्रवासी व विद्यार्थ्यांमधून उपस्थित करण्यात आला. या परिसरात अप्रिय घटना घडण्याची तर बसस्थानकाचे नियंत्रक आणि अन्य कर्मचारी वाट पाहत नाहीत ना, असा मुद्दाही विद्यार्थ्यांच्या चर्चेतून समोर आला आहे. तिथे प्रवासी ला बसण्यासाठी कसलीच सोय नाही प्रवासी ला बसायचे म्हटले तर कोणत्या हि हॉटेल मध्ये किंवा उन्हात थांबावे लागत आहे तर  महिलेला पावसाळयात पाऊसात उभा रहावे लागतात शाळेचे विदयार्थी असतील किंवा कॉलेज चे विदयार्थी असतील यांना 12 हि माहिने हॉटेल समोर थांबावे लागते  अशी अवस्था नान्नज च्या बस स्थानक ची झाली आहे त्या बस स्थानक च्या भिंती पडलेल्या आहे तिथे अस्वछता झालेली आहे तिथे कुत्रे जनावरे बसतात व मोटारसायकल लावायला पार्किंग असल्या सारखे लोक तिथे गाडया लावतात छोटया छोटया गावाना बसस्थानक आहे पण नान्नजला अद्यापही नविन बसस्थानक नाही. जे जुने आहे त्याची ही मोठया प्रमाणात पडझड झालेली आहे व कधी दुरूस्ती पण केलेली नाही जामखेड तालुक्यात नान्नज हे गाव ची बाजार पेठ दोन नंबरची समजली जाते त्यामुळे या गावाला येणाञा जाणाञां प्रवाश्यांच्या संख्या जास्त असल्याने त्यांना सुध्दा उन्हाळयात  उन्हात व पावसाळयात पाऊसात उभे रहावे लागत आहे  तसेच नान्नज च्या बसस्थानक वर महिलांना शौचालय ला जाणे साठी शौचालय पण नाही  मग महिलानी जायचे कोठे असा खुप मोठा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे अशी परिस्तिथी नान्नज च्या बस स्थानक ची झालेली आहे नान्नज ला ग्रामपंचायत मार्फत पण शौचालय बसस्थानक वर बांधलेले नाही व पिण्याच्या पाण्याची पण सोय नाही बसस्थानक च्या ठिकाणी सिमेंट पाण्याची टाकी फक्त शो साठी बांधण्यात आलेली आहे त्या टाकी मध्ये कधीच पाणी नसते कधी पाहिले तरी टाकी कोरडीच असते ग्रामपंचायत पदाधिकारी मध्ये दोन गट झाल्याने गावा कडे दुर्लक्ष आहे जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा राम शिंदे यांनी जसे नंदादेवी देवस्थान ला एक कोटी आकरा लाख रूपये मंजूर करून लगेच भूमीपूजन पण केले व कामाला पण सुरूवात झाली तसे नान्नज च्या बस स्थानक  कडे पण जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे हे नान्नज गणातील आहे हे दोनदा पंचायत समिति ला सभापती म्हणून निवडून आलेले आहेत मग त्यांनी लक्ष दिले तर बस स्थानक नान्नजला नविन होणारच असे नान्नज च्या ग्रामस्थ मधून चर्चा होत आहे महिला व विदयार्थी यांची जी बसण्या साठी गैरसोय होती तर ती होणार नाही  जिल्ह्याचे पालक मंत्री  प्रा राम शिंदे यांनी नान्नजला बस स्थानक  मंजूर करून आणावे अशी मागणी नान्नज च्या प्रवासी, महिला सह विद्यार्थी ग्रामस्थानी केली आहे .