Breaking News

अंजलीला वाढदिवसाची भेट राणा आणून देणार का ?

तुझ्यात जीव रंगला या मालिकेत गेला काही काळ ज्या क्षणाची सर्वजण आतुरतेने वाट पाहताहेत तो क्षण अखेर येऊन ठेपलाय. राणाचा अपघात झाल्यानंतर त्याने शेती आणि कुस्तीची आशाच सोडली होती. त्यामुळे नैराश्याच्या गर्तेत गेलेल्या राणाला अखेर या मातीनेच पुन्हा उठून उभं राहण्याचं बळ दिलं. 


अंजली व गावकऱ्यांच्या साथीने राणा वज्रकेसरीसाठी पुन्हा उभा राहिलाय. उद्या रविवार, २६ नोव्हेंबरला राणा व दलजितचा जंगी कुस्तीचा सामना रंगणारेय. अंजलीला वाढदिवसाची भेट म्हणून वज्रकेसरीची गदा आणण्याचा राणाचा निश्चय आहे, 

पण दलजितला हाताशी घेऊन नंदिताने काही नवे डावपेच आखलेत. अटीतटीच्या या सामन्यात हिमालयाला सह्याद्रीचा मावळा भिडणारेय. या महाएपिसोडसाठी १७ ते १९ नोव्हेंबरला कोल्हापूरजवळील इचलकरंजी इथे शूटिंग पार पडले