Breaking News

लातूर-नांदेड महामार्गावर भीषण अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू

लातूर-नांदेड महामार्गावर मेटॅडोर क्रूजर जीप आणि टेम्पोचा भीषण अपघात झाला. चाकूरहुन लातुरकडे येणारी ही गाड़ी रसत्याच्या कडेला उभ्या असलेल्या सोयाबीन घेऊन जाणाऱ्या टेम्पोवर आदळली. 


या भीषण अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला असून  13 जण जखमी झाले आहे. लातूर नांदेड रोडवर पहाटे 6.30 वाजता हा अपघात झालाय.जखमींवर लातुरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

ही धडक इतकी भीषण होती की यात क्रूजरचा चक्काचूर झालाय. या अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू झालाय तर 13 जण जखमी झालेत.