तरुणाईचं लाडकं V चॅनल लवकरच होणार बंद !
जेव्हा फेसबुक, युट्यूब आणि सोशल मिडिया अस्तित्वात ही नव्हते तेव्हा व्ही चॅनल तरुणाईच्या आवडीचे बनलं होतं. हे चॅनल सध्या शेवटच्या घटका मोजत असून लवकरच बंद होणार आहे.
या चॅनलवर तरुणाईंला डोळ्यासमोर ठेऊन दररोज नवी गाणी, शो आणि सेलिब्रिटींच्या मुलाखती अशी मेजवानी चॅनल व्ही पुरवत होता.तरुणाईसाठी या चॅनलने अनेक मनोरंजनात्मक कार्यक्रम केले. जुने, नव्या गाण्यासाठी हमखास चॅनल V पाहिलं जातं होतं. आता मात्र काळाच्या ओघात चॅनल माघारी पडलं. आता चॅनल बंद होणार आहे.आता चॅनल V च्या जागी आता स्टार इंडियाचं एक कन्नड स्पोटर्स चॅनल सुरू होणार आहे.