Breaking News

डोकलाममध्ये चीनच्या हालचाली नाहीत : व्ही.के.सिंग


नागपूर : डोकलाम परिसरात चीनच्या काहीच हालचाली नाहीत. यासंदर्भात पुढे आलेली माहिती, बातम्या तथ्यावर आधारित नसून केवळ अफवा आहेत. त्यामुळे तुर्तास डोकलामवरून कुठल्याही द्वीपक्षीय वादाची शक्यता नसल्याचे प्रतिपादन परराष्ट्र राज्यमंत्री जनरल व्ही.के.सिंग यांनी केले. ते आज, बुधवारी नागपुरात आयोजित एका शैक्षणिक कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलत होते. 

गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीनमध्ये पुन्हा डोकलामवरून वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. यासंदर्भात काही वृत्तवाहिन्यांमध्ये बातम्याही प्रसारित झाल्यात. त्यानुसार डोकलाम येथील वादग्रस्त भागातून चिनी सैन्याने माघार घेतली असली तरी सीमेपासून जवळच चीनच्या सैनिकांनी तळ ठोकला आहे. तसेच त्या परिसरात चीनने 400 मीटर उंचीची भींत उभारली आहे. 

दैनिक लोकमंथन च्या बातम्या तुमच्या Whatsapp गृपवर मिळविण्यासाठी 8530730485 हा नंबर तुमच्या गृपवर Add करा

आपल्या हालचाली कुणाच्या लक्षात येऊ नयेत यासाटी चीनने ही भींत बांधल्याचे बोलले जाते. त्याचप्रमाणे या परिसरात मोठ्या संख्येने चिनी सैनिक तैनात करण्यात आले आहेत. या सैनिकांसाटी 16 खंदक बांधण्यात आले असून सुमारे 200 तंबू देखील उभारण्यात आल्याचे सदर वृत्तात नमूद आहे. इतकेच नव्हे तर भारतीय सैन्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी चीनने टेहाळणी उपकरणे बसवल्याचेही बोलले जाते. भारत, चीन आणि भूतान या तीन देशांच्या सीमा डोकलाममध्ये जिथे मिळतात त्या भागाला ट्राय जंक्शन म्हणतात. चीनने त्या ट्राय जंक्शनजवळ रस्ता बांधणीचे काम सुरु केल्यामुळे संघर्षाला सुरुवात झाली होती. 

कारण चीनने जर इथे रस्ता बांधला असता तर भारताचा रणनितीक दृष्टया महत्वाचा भूप्रदेश चीनच्या टप्प्यात आला असता. गेल्या 16 जूनपासून डोकलाममध्ये भारत आणि चीन यांच्यात तब्बल 73 दिवस शीतयुद्धसुरू होते. यासंदर्बात बोलताना व्ही.के. सिंग म्हणाले की, डोकलामसंदर्भात प्रकाशित झालेल्या बातम्या तथ्यावर आधारित नाहीत. यासंदर्भात अफवाच अधिक आहेत. या परिसरातून चीनने माघार घेतल्यानंतरची परिस्थीती तुर्तास यथास्थिती आहे. तसेच भारत संपूर्ण परिसस्थीतीवर व्यवस्थित लक्ष ठेऊन असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.