Breaking News

प्रवरा’मध्ये विविध अभ्यासक्रमांना मान्यता

प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाला भारत सरकारच्या मानव संसाधन मंत्रालयाच्या ऑल इंडिया कॉन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनने प्रधानमंत्री कौशल्य विकास योजने अंतर्गत २०१७-१८ सत्रासाठी विनामूल्य विविध सहा कोर्सेसची मान्यता मिळाली असून ए. आय. सी. टी. ई. व एन. एस. डी. सी. या शासकीय संस्थांशी संलग्न असलेल्या या कोर्सेससाठी मोफत प्रवेश सुरु झाले आहेत, अशी माहिती प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ. यशवंत खर्डे यांनी दिली. 



या विनामूल्य कोर्सेसमध्ये वेल्डिंग अँड क्वालिटी टेक्निशियन, फिल्ड टेक्निशियन नेटवर्किंग अँड स्टोरेज, नेटवर्क इंजिनिअर, इंडस्ट्रियल ऑटोमेशन, जुनियर सॉफ्टवेअर डेव्हलपर, डोमेस्टिक डेटा एन्ट्री ऑपरेटर या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी १० वी ते इंजिनीरिंग उत्तीर्ण अशी शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत आहे. कोर्सेस पूर्ण केल्यावर शासनाचे प्रमाणपत्र मिळणार असून त्याचा उपयोग रोजगाराच्या नवीन संधीकरिता होणार असल्याचे योजनेचे नोडल ऑफिसर प्रा. अब्दुल हमीद अन्सारी यांनी सांगितले.