Breaking News

प्रवरानगर पब्लिक स्कुलचे रविवारी स्नेहसंमेलन

प्रवरा सेंट्रल पब्लिक स्कूल चे चौथे वार्षिक स्नेहसंमेलन येत्या रविवारी {दि. ३} दुपारी १. ३० वा. होत आहे. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. येथील अथेलेटिक्स मैदानावर स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती प्राचार्या स्वाती लोखंडे यांनी दिली. 



यावेळी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे संचालक कृषीभूषण बन्सी तांबे हे यावेळी उपस्थित राहणार आहेत. मान्यवरांच्या हस्ते वार्षिक पारितोषिक वितरण होणार असून यावेळी विविध गुणदर्शन कार्यकर्माचेही आयोजन करण्यात आले आहे.