Breaking News

प्रेमसंबंधातून मुलीच्या वडिलांनी तरुणाची केली हत्या


मुलीच्या आंतरजातीय प्रेमाला विरोध करत मुलीच्या बापानं तरुणाचा जाळून खून केल्याची धक्कादायक उघडकीला आलीये. या प्रकरणी आरोपी सोपान कोल्हेला अटक करण्यात आली आहे.

बुलडाणातील मेंढळी गावातील मुलीचं गावातीलच अमोल झाम्बरे नावाच्या युवकाशी प्रेमसंबध होते. अमोल हा दुसऱ्या जातीचा असल्या कारणाने हे संबंध मुलीच्या वडिलांना मान्य नव्हतं. तरीही दोघे जुमानत नसल्यानं सोपान कोल्हे या मुलीच्या वडिलांने अमोलला त्याच्या मामाच्या शेतात नेऊन जाळून टाकून निर्घृणपणे हत्या केलीय.