Breaking News

दलित पँथरच्या कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता

औरंगाबाद, दि. 02, नोव्हेंबर - मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर अंदोलनात सहभागी झालेल्या दलित पँथरच्या कार्यकर्त्यांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यू.पी. देवर्षी यांनी निर्दोष  मुक्त केले आहे.
तत्कालीन मराठवाडा विद्यापीठास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी 10 एप्रिल 1978 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या वाहनावर  गंगाधर गाडे, रतनकुमार पंडागळे, रमेशभाई खंडागळे, माणिक साळवे व महिला कार्यकर्त्यांनी आडवून दगडफेक केली होती. पोलिसांनी तपासाअंती न्यायालयात दोषारोपपत्र दाखल  केले होते. न्यायालयाने या पैकी सात जणांना जामीन मंजूर करीत उर्वरित आरोपींना हजर करा, असे आदेश दिले होते. सबळ पुराव्याअभावी सर्व पँथर कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता  करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.