Breaking News

बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मदिनी शहरात शंभर सिटी बस सेवेचा प्रारंभ

औरंगाबाद, दि. 02, नोव्हेंबर - अर्बन ट्रान्स्पोर्ट मोबिलिटी’ हा स्मार्टसिटी योजनेतील कामांचा एक भाग असल्याने महापालिका शंभर सिटीबसची खरेदी करून त्या चालवण्यासाठी  सर्व्हिस प्रोव्हायडरला देणार आहे. येत्या 23 जानेवारीला सिटीबस सेवा सुरू करण्याचे नियोजन असून, त्यासाठी महापालिकेची यंत्रणा कामाला लागली आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा 23 जानेवारी हा जन्मदिन आहे. या मुहूर्तावर ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. पालिका प्रशासनाला देखील त्यांनी या दृष्टीने तयारी क रण्याच्या सूचना दिल्या. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, अर्बन ट्रान्स्पोर्ट मोबिलिटीसाठी 168 कोटी रुपयांचा निधी आहे. त्यातून शंभर सिटीबस खरेदी करण्याचे नियोजन आहे.