Breaking News

सातार्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार


अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी सोनके, ता. कोरेगाव येथील श्रीकांत जालिंदर शिंदे, वय २५ याच्या विरोधात वाठारस्टेशन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संशयित शिंदे हा फरार झाला आहे.
गुन्ह्याची पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अत्याचारग्रस्त कुटुंबातील मुलगी ही कुटुंबासमवेत राहावयास आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास संबंधित मुलगी ही घरात झोपली असताना संशयित आरोपी श्रीकांत शिंदे हा दरवाजाची आतून लावलेली कडी काढून आतमध्ये आला. 


त्या मुलीला जीवे मारण्याची धमकी देत त्याने संबंधित मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर अत्याचारग्रस्त मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून वडील जागे झाले. त्यांनी घटनास्थळावरून संशयित आरोपी श्रीकांत शिंदे याला पळून जाताना पाहिले. त्याला पकडण्याच्या प्रयत्नात संशयित शिंदे याचा मोबाईल व चपला घराजवळच पडल्या.