Breaking News

पाशा पटेल यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही; मनसेचा इशारा


लातूर, दि. 30, नोव्हेंबर - कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्यातील झोपलेला शेतकरी नेता जागा करायचा आहे असे सांगत आज मनसेच्या कार्यकर्त्यांनी टाऊन मैदान ते विवेकानंद चौक अशी दिंडी काढली. शेतक-यांच्या ज्वलंत प्रश्‍नांवर बोलते न झाल्यास किंवा उपाययोजना न केल्यास लातूर जिल्ह्यात फिरु दिले जाणार नाही, असा इशारा या कार्यकर्त्यांनी दिला आहे. 

मनसेच्या कार्यकर्त्यांना मुळात पाशा पटेल यांच्या घरावरच धडकायचे होते पण पोलिसांनी परवानगी नाकारल्याने त्यांना विवेकानंद चौकात थांबावे लागले. या ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी असंतोष प्रकट केला. पाशा पटेल यांचे चिरंजीव परवेज पटेल यांनी मनसेचे निवेदन स्विकारले.