Breaking News

संगमनेर महाविद्यालयात रक्तदान शिबिर उत्साहात


।संगमनेर/प्रतिनिधी ।२९ - येथील संगमनेर महाविद्यालयातील एन. सी. सी. विभागामार्फत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. ५७ महाराष्ट्र बटालियन एन. सी. सी. अहमदनगर व ७ महाराष्ट्र (गर्ल्स) बटालियन एन. सी. सी. औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचे उदघाटन वरिष्ठ पोलिस निरिक्षक गोकुळ औताडे यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. के. देशमुख, उपप्राचार्य व एन. सी. सी. प्रमुख कॅप्टन डॉ. अरुण गायकवाड, उपप्राचार्य डॉ. आर. बी. ताशिलदार, उपप्राचार्य श्रीहरी पिंगळे, एन. सी. सी. प्रमुख (मुली) प्रा. बी. एस. मणियार, प्रा. जी. के. सानप आदी उपस्थित होते.

रक्तदान शिबिरासाठी जनसंपर्क अधिकारी प्रमिला कडलग, अर्पण ब्लड बँक यांचे सहकार्य लाभले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रा. हेमलता तारे, प्रा. नितीन अरगडे, अंडर ऑफिसर प्रितम गडगे, मोनिका घटे, अक्षय कुमकर व आशुतोष शेळके व अक्षय कुमकर यांनी पुढाकार घेतल.