Breaking News

डीएसकेंच्या गहाण मालमत्तांची जप्ती सुरू

पुणे, दि. 11, नोव्हेंबर - बांधकाम व्यावसायिक डीएस कुलकर्णींना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. त्यांना एका आठवड्याचा अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला. मात्र दुसरीकडे बँकांनी त्यांच्याविरोधात कारवाई सुरू केली आहे. 
डीएसके यांच्यावर अनेक बँकांचे मिळून तब्बल चौदाशे कोटींचे कर्ज आहे. त्यासाठी त्यांनी मालमत्ता गहाण ठेवल्या आहेत. याच मालमत्ता आता बॅकांकडून जप्त करण्यास सुरूवात झाली आहे. बालेवाडी आणि फुरसुंगीमधील जमीन सेंट्रल बँक ऑफ इंडियाने जप्त केली आहे. फुरसुंगीमधील जमीन ही डीएसकेंच्या ड्रीम सीटीचा भाग आहे.
सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून डीएसके आणि त्यांच्या पत्नीनं 82 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. ते परत करणं डीएसकेंना जमले नाही. त्यामुळे मालमत्ता जप्ती सुरू झाली आहे. यामुळे डीएसकेंच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.
बांधाक व्यवसायाला बंदी आल्यानंरत व्यवसायिक डी एस कुलकर्णी आर्थिक दृष्ट्या अडचणीत आले आहेत.पासून अनेकांनी घर बूक केलं आहे. मात्र अद्यापही त्यांना ताबा मिळालेला नाही. यातच त्यांनी ड्रीम सिटी प्रोजेक्ट हाती घेतला. या प्रकल्पासाठी त्यांनी सर्व आर्थिक ताकद पणाला लावली होती. या प्रकल्पासाठी अधिक पैसा गोळा करण्यासाठी त्यांनी आकर्षक योजना जाहीर करत ठेविंवर 12 टक्के व्याज देण्याच जाहीर केल होते. यामुळे अनेकांनी लाखो रुपये यामध्ये गुंतवले होते. मात्र लोकांना नियमीत व्याज देणे अशक्य झाल्याने त्यांनी इतर व्यवसायातील पैसा इकडे वळवला. त्यांनी डीएसके टोयाटोच्या शोरुमही बंद केल्या. तेथील कामगारांनीही काही महिन्याचा पगार रखडल्याने डीएसकेंच्या घरासमोर आंदोलन केले होते. याही परिस्थितीत डीएसकेंनी लोकांना त्यांचे गुंतवलेले पैसे देण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र दिवसें-दिवस आश्‍वासनांची पूर्तता होत नसल्याचे लक्षात आल्यावर गुंतवणूकदारांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे धाव घेत रांगा लावून तक्रारी दाखल केल्या. सेंट्रल बँक ऑफ इंडियाने मालमत्तेचा ताबा घेतल्यासंदर्भात शुक्रवारी नोटीस प्रकाशित केली आहे. कर्जाची रक्कम फेडण्यास विलंब झाल्यास इतर बँकाही मालमत्तेचा ताबा घेतील. यामुळे ठेवीदारांचे पैसे परत करणे अशक्य होणार आहे.