महाराष्ट्र चेस असोसिएशनच्या मानद सचिवांना कार्यकारिणी सभा घेण्यास सहधर्मादाय आयुक्तांची मनाई
पुणे, दि. 11, नोव्हेंबर - महाराष्ट्र चेस असोसिएशन या बुद्धीबळाच्या राज्य संघटनेची नविन घटना दुरूस्ती नुकतीच मंज़ूर झाली होती. त्या विरूद्ध संस्थेचे मानद सचिव दिलीप पागे यांनी दाखल केलेले अपीलही फेटाळले होते. तरीही जुन्या नियमावली नुसार मानद सचिवांनी कार्यकारिणीची सभा बोलवून निर्णय घेण्याला सह धर्मादाय आयुक्त शिवाजीराव कचरे यांनी स्थगिती दिली आहे.
संघटनेतील अंतर्गत गटबाज़ीमुळे मानद सचिव दिलीप पागे यांनी संस्थेच्या घटनादुरूस्ती विरूद्ध अपील केले होते. हे अपील फेटाळून लावताना निकालपत्रात पागे यांच्यावर गंभीर ताशेरे ओढले आहेत. सचिव असताना त्यांचे अखत्यारीत घटनादुरूस्तीची सर्व प्रक्रिया पूर्ण होऊनही ती मंजूरीसाठी वेळेत सादर न केल्याने राज्य संघटनेचे संलग्नत्व ऑल इंडिया चेस फ़ेडरेशन या शिखर संघटनेने रद्द केल्याची नामुष्की ओढावल्याचा ठपका पागे यांचेवर ठेवण्यात आला होता.
महाराष्ट्र चेस असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून जळगांव येथील जैन उद्योग समूहाचे अशोक जैन यांची निवड झाली होती. तद् नंतर 2012 मध्ये ऑल इंडिया चेस फ़ेडरेशनने राज्य संघटनेला त्यांच्या मार्गदर्शक तत्वांनुसार कालबद्ध मुदतीत घटनादुरूस्ती करण्याचे निर्देश दिले होते. त्याची अंमलबजावणी करून त्यानुसार राज्य संघटनेच्या निवडणुकाही घेण्यात आल्या होत्या. तथापि पागे यांनी त्याविरुद्ध घटनादुरूस्ती झाली नसल्याची भूमिका घेऊन कामकाजास हरकत घेत होते.
घटनादुरूस्तीस अधिन राहून नविन तरतूदींनुसार अध्यक्ष अशोक जैन यांनी 12 नोव्हेंबरला जळगांवला कार्यकारिणीची बैठक बोलविली होती. तथापि ही नोटीस मिळाल्यानंतर सचिव पागे यांनी जुन्या नियमावलीच्या आधारे एक दिवस आधी 11 नोव्हेंबरला नागपूरला बैठक बोलविण्याची नोटीस काढली. तसेच पागेंनी बोलविलेल्या या बैठकी मध्ये संघटनेच्या वतीने दाखल सर्व न्यायिक प्रकरणे मागे घेण्याचा विषय चर्चेस घेतला जाणार होता. विशेषत्वाने व ऑल इंडिया चेस फ़ेडरेशन या शिखर संस्थेने रद्द केले त्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात केलेली रीट याचिका मागे घेण्याचा विषय होता.