साहित्य माणसाला जोडण्याचे काम करते - यशवंतराव गडाख
अहमदनगर, दि. 06, नोव्हेंबर - राजकीय लोक स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी जातीजातीत तेढ निर्माण करून समाजाचं विघटन करतात तर साहित्य आणि साहित्यिक माणसं आणि माणसांची मने जोडण्याचे काम करतात. त्याच बरोबर समाज एकसंघ ठेवण्याचे काम करतात असे परखड मत जेष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे व सावेडी उपनगर शाखेच्या वतीने आयोजित पहिल्या विभागीय मराठी साहित्य संमेलनात निवेदक सुधीर गाडगीळ यांनी त्यांची प्रकट मुलाखत घेतली त्यावेळी ते बोलत होते. गाडगीळ यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांवर गडाख यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली. यावेळी त्यांच्यातील साहित्यिकाचे दर्शन यावेळी झाले.
यावेळी राजकारण आणि समाजकारणात यशस्वी होण्यासाठी मला वाचन उपयोगी पडले. ही गोष्ट त्यांनी कबुल केली. राजकारण हे रुक्ष क्षेत्र आहे तर साहित्य हे मनाला आनंद देणारे क्षेत्र आहे. गावातील जत्रा, यात्रा, कथा, पारायणं अनुभवल्यामुळे आपलं मन समृद्ध होतं. राजकीय व्यक्तीपेक्षा साहित्यिकांशी माझे जास्त जवळचे नाते जुळले. शांता शेळके, ग.दि.माडगुळकर, पु.ल.देशपांडे,गुलजार यांच्या सारख्या मोठ्या साहित्यिकांना भेटता आलं, त्यांच्याशी बोलता आलं त्याबद्दल मी समाधानीआहे. ज्ञानेश्वरी सप्तशताब्दी सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील अनेक नामवंत, प्रतिभावंत साहित्यिकांना निमंत्रित केलं. त्याचबरोबर शरद पवारांना ही निमंत्रित केलं होतं. त्यांना नेवाशावरून एस.टी. ने सोनईला आणलं होतं.याही आठवणींना त्यांनी यावेळी उजाळा दिला.
गाडगीळांच्या राजकारण्यांचे दुटप्पी वागणे आणि बेगडी रूप पाहून काय वाटतं ? या प्रश्नावर त्यांनी सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही . राजकारण्यांचे बेगडी रूप मी जवळून पाहिले. तेव्हा असं वाटतं की ,ही माणसं एवढी क्षुद्र का होतात, विचाराने एवढी संकुचित का होतात असे प्रश्न पडतात. मात्र मी राजकीय विरोधकांकडे कधी शत्रुत्वाच्या भूमिकेतून पाहिलं नाही. राजकीय आणि साहित्यिकांशी संवाद साधनं अवघड असतं, मात्र दत्ता देशमुख, मोती भाऊ फिरोदिया, आबासाहेब निंबाळकर यांच्या संपर्कात मी आलो त्यामुळे माझ्या मनात कोणाबद्दल द्वेष, मत्सर ही भावना ठेवली नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
शेतकर्यांच्या प्रश्नाबद्दल सरकारच्या उदासीन भूमिके बद्दल गडाख म्हणाले, अनेक सरकारे आले आणि गेले मात्र त्यांनी शेतकरी कधी केंद्रबिंदू मानलाच नाही. त्याच्या काबाड कष्टाला मोल नाही, शेतीमालाला भाव नाही. निसर्गाच्या दृष्टचक्रात, दुष्काळात डोळयांसमोर उभी पिके जळतांना पाहून शेतकर्यांना प्रचंड दुःख होते. आणि त्यांच्याकडे आत्महत्तेशिवाय दुसरा पर्याय राहत नाही. शेती आणि शेतकर्यांची दुरवस्था होत आहे. नवी पिढी आता शेती करायला तयार नाही त्यामुळे भविष्यकाळात 100 कोटी लोकांना धान्य दूध, भाजीपाला, कसा मिळणार ? याचे उत्तर सरकारला शोधावेच लागेल.
भटकंती हा यशवंतराव गडाखांचा आणखी एक आवडता छंद. या छंदाविषयी बोलतांना ते म्हणतात. मला निसर्ग, पाऊस खूप आवडतो, मेळघाट आणि अंबोलीचा निसर्ग मला खुप आवडतो. झाडं, पानं, फुलं, वेली यांच्यात मी रमतो,गेल्या 40 वर्षांपासून मी अंबोलीला जातो. अंबोलीचं निसर्ग सौंदर्य पाहावे ते पावसाळ्यातच, धुक्यात पडणारा पाऊस पाहण्यासारखा,रात्र, चांदण्या, चंद्र, रातकिडे,जंगली प्राण्यांचा आवाज ऐकत झोपी जाण्यासारखा आनंद नाही. माणसांच्या जंगलातून प्राण्यांच्या जंगलात जाणं यातून एक नवी ऊर्जा मिळते,असे ते म्हणाले.
मोठया माणसांनी सर्व सामान्य माणसात मिसळलं पाहिजे. त्यांची सुख दुःख समजून घेतली पाहिजेत. मला भेटलेल्या माणसांनी मला निर्मळपणा दिला. त्यामुळे राजकारणापेक्षा मी समाजकारणाला अधिक महत्व देतो अस ते म्हणाले.
संमेलनाच्या दुसर्या दिवशी पहिल्या सत्रातील, पहिल्याच या प्रकट मुलाखतीसाठी साहित्य रसिक श्रोत्यांनी मोठी गर्दी केली होती.यावेळी व्यासपीठावर स्वागताध्यक्ष नरेंद्र फिरोदिया उपस्थित होते. शेवटी संयोजक जयंत येलूलकर यांनी आभार मानले व शुभेच्छा दिल्या.