वर्षभरात सातारा जिल्ह्यातील 31 लाचखोर शासकीय कर्मचारी जाळ्यात
सातारा, दि. 6 (प्रतिनिधी) : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळयात गेल्या दहा महिन्यांत लाच घेताना 23 प्रकरणांमध्ये अधिकारी-कर्मचारी व इतर खाजगी व्यक्ती अशा 31 जणांना रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणांत सर्वाधिक महसूल खात्याची आठ, तर पोलीस खात्यामधील तीन प्रकरणे आहेत. बेहिशोबी मालमत्ताप्रकरणी लाचलुचपत मार्फत तीन कर्मचार्यांच्या मालमत्तेची चौकशी सुरु असल्याची माहिती पुढे आली आहे.
या विभागाचे उपअधीक्षक सुहास नाडगौडा यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे 30 ऑक्टोबर ते चार नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जागृती सप्ताह साजरा करण्यात आला. त्याची माहिती देताना नाडगौडा बोलत होते. त्यांनी सांगितले, जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत आमच्या विभागाकडे आलेल्या तक्रारींवरुन 23 सापळा कारवाया करण्यात आल्या. या प्रकरणांमध्ये सर्वाधिक आठ प्रकरणे महसूल खात्याशी संबंधित आहेत. लाचेच्या तीन प्रकरणांत पोलीस खात्यातील कर्मचार्यांवर कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय कृषी, पर्यावरण, सार्वजनिक बांधकाम, उत्पादन शुल्क, वन विभाग, शिक्षण आणि ठाामविकास, नगरविकास, विधी व न्याय, पाटबंधारे, आरोग्य व वैद्यमापन (वजन मापे) या खात्यांशी संबंधित सापळा कारवाया करण्यात आल्या. शिक्षण व वन खात्यातील प्रत्येकी एका प्रकरणात वर्ग एक व वर्ग दोनच्या अधिकार्यांवर कारवाई झाली. उर्वरित 21 प्रकरणांमध्ये वर्ग तीन व वर्ग चारच्या कर्मचार्यांवर कारवाई झाली. या दहा महिन्यांत लाचलुचपतच्या 11 खटल्यांचे निकाल झाले. त्यामध्ये तीन खटल्यांत आरोपींना शिक्षा झाली. गेल्या वर्षी याच दहा महिन्यांच्या कालावधीत एकूण 28 कारवायांमध्ये अधिकारी-कर्मचारी लाच घेताना रंगेहाथ सापडले, असे नाडगौडा यांनी यावेळी सांगितले. दरम्यान 30 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या उपस्थितीत सर्व शासकीय अधिकारी-कर्मचार्यांनी भ्रष्टाचारविरोधी शपथ घेऊन दक्षता जनजागृती सप्ताहास सुरवात झाली. या सप्ताहात आकाशवाणीवर मुलाखत, एकता व दक्षता जनजागृती दौड, तक्रारदार बैठक व त्यांच्या अडचणींचे निराकरण आदी उपक्रम राबविण्यात आले. या कालावधीत सातार्याबरोबरच कोरेगाव, फलटण, वाई, दहिवडी, म्हसवड, कराड या शहरांत दक्षता जनजागृतीवर कार्यक्रम घेण्यात आले.