Breaking News

जिल्हा पुरोहित मंडळाच्यावतीने दशक्रिया सिनेमाचा निषेध

केंद्र सरकार,राज्य सरकार,सेन्सार बोर्ड यांनी दशक्रिया या चित्रपटावर बंदी न घातल्याने सावेडी रोडवरील माय सिनेमा येथे अहमदनगर जिल्हा पुरोहित मंडळाच्या वतीने पोस्टर जाळून निषेध केला.

ब्राह्मण समाज हा अत्यंत शांतता प्रिय असून,सर्व जाती धर्माचा आदर करणारा आहे तरी काही विघ्नसंतोषी, समाजकंटक लोक अशा चित्रपटाच्या माध्यमातून समाजात व जाती, जातीमध्ये मुद्दाम तेढ निर्माण करीत आहेत . हिंदू धर्मातील वेद,शास्र,उपनिषेध यात दिलेल्या कर्मावर टिका केलेली असुन हिंदू धर्मात असंतोष पसरविण्याचे काम या सिनेमाने केले आहे. या सिनेमातून­ पुरोहित वर्गाची चेष्टा करण्यात आली आहे. दिग्दर्शक, प्रोड्युसर, आदीवर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी यावेळी केली.

यावेळी जिल्हा पुरोहित मंडळाचे अध्यक्ष किशोर जोशी, उपाध्यक्ष रा बा धर्माधिकारी,सचिव मयुर जोशी, सचिन कुलकणी, अक्षय चिंधाडे, अमोल कुलकर्णी, अनिकेत मुळे ,सुहास मुळे,देवेंद्र तिवारी,श्रीपाद जोशी,श्रीपाद धर्माधिकारी, ब्राह्मण समाजबांधव व भगिनी उपस्थित होत्या