Breaking News

आश्वीच्या राम मंदिरात चोरीने उडाली खळबळ.


संगमनेर तालुक्यातील आश्वी पोलिस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आश्वी बुद्रुंक येथिल पुरातन राम मंदिराच्या मुख्य दरवाजाचे कुलुप तोडून अज्ञात चोरट्याने चार पंचधातुच्या पुरातन मुर्तीची चोरी करत पोबारा केल्याने आश्वी परिसरात एकच खळबळ उडाली असून चोराला शोधण्याचे मोठे आवाहन आश्वी पोलिसान समोर उभे ठाकले आहे.
आश्वी बुद्रुंक येथिल बाजारतळा लगत सुमारे दिडशे वर्षांपुर्वीचे भगवान श्री राम, बंधु लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न व माता सिता यांचे जिल्हायातील एकमेव मंदिर या ठिकानी आहे. या मंदिराच्या दरवाजाला कडीकोंडा व साखळीला कुलुप लावलेले असतानाही, रविवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी हे कुलुप तोडून मंदिरातील दिड किलो वजनाची तांबा धातुची विश्वकर्मा देवाची मुर्ती, दोन किलो वजनाची पंचधातुची हानुमान मुर्ती, अर्धा किलो वजनाची लक्ष्मी देवीची मुर्ती, पाव किलो वजनाची गुरूदेव दत्ताची मुर्ती चोरुन पोबारा केला आहे. 

सकाळी नाके गुरु दर्शना साठी मंदिरात आले असता त्यांना चोरी झाल्याचे दिसले. त्यांनी पुजारी पद्माकर नाके व ग्रामस्थांना याबाबद् कळविले व घटनेची माहिती पोलीस स्टेशनला दिली. सहाय्यक पोलिस निरिक्षक उजे यांनी घटनास्थळी भेट देत घटनास्थळाची पाहणी केली आहे. तर मंदिरात चोरी झाल्याने आश्वी परिसरात एकचं खळबळ उडाली असून या चोरट्याचा शोध घेण्याचे मोठे आवाहण आश्वी पोलिसापुढे उभे ठाकले आहे.