Breaking News

प्रेरणादायी यशकथांचा लोकराज्य प्रकाशित

मुंबई, दि. 07, नोव्हेंबर - राज्य शासनाने गेल्या तीन वर्षांच्या कालावधीमध्ये राबविलेल्या विविध योजनांचा लाभ घेऊन सामाजिक व आर्थिक स्तर उंचावलेले नागरिक,उद्योजक ,  गाव यांच्या यशोगाथा सांगणारा लोकराज्यचा नोव्हेंबर 2017 चा ‘होय, हे माझं सरकार’ हा विशेषांक नुकताच प्रकाशित झाला आहे. हा अंक स्टॉलवर सर्वत्र उपलब्ध आहे.
शासनाच्या योजनांचा लाभ घेत तसेच विविध मोहिमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होत नागरिकांनी गावागावांमध्ये शौचालय उभारले, गाव स्वच्छ आणि काही गावे टँकरमुक्त झाली.  बेरोजगार तरुण-तरुणींनी मुद्रा बँक योजनेतून उद्योग स्थापन केला. प्रशासनाने अनेक सेवा ऑनलाइन देऊन नागरिकांच्या वेळेची बचत केली.
जलयुक्त शिवार योजनेंर्गत अवर्षणग्रस्त भागातील अनेक गावे टँकरमुक्त व जलयुक्त झाली. या अंकात समावेश केलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील खामखेडा,खांडवा या गावांनी केलेली  जलक्रांती आणि स्मार्ट, सुंदर आणि स्वच्छ गाव म्हणून ओळख निर्माण करणार्‍या अवनखेड या गावाची यशकथा प्रेरणादायी आहे. अशा प्रातिनिधिक यशकथांचा या अंकात समावेश  करण्यात आला आहे. या अंकाची किंमत 10 रुपये आहे.