Breaking News

पुण्यात 5 वाहनांचा विचित्र अपघात

पुणे, दि. 07, नोव्हेंबर - शहरातील अप्पर इंदिरानगर भागात पाच गाड्यांचा विचित्र अपघात अपघातात 2 जणांचा मृत्यू तर 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. 2 पीएमपीएमएल  बस, कोल्ड्रिंग्स घेऊन जाणारा टेम्पो आणि 2 दुचाकींचा मोठा अपघात या ठिकाणी झाला.पीएमपीएमल बस आणि कोल्ड्रिंग्स घेऊन जाणारा ट्रक एकमेकांवर आदळला. त्यानंतर दोन  दुचाकीही आदळल्या. उताराचा रस्ता असल्याने वाहनांवर नियंत्रण ठेवता आले नाही. त्यामुळे हा अपघात घडल्याची माहिती आहे. दरम्यान गंभीर जखमींना रुग्णालयात दाखल क रण्यात आले आहे. शिवाय वाहने रस्त्यावरुन हटवून वाहतूक सुरळीत केली जात आहे. मात्र या विचित्र अपघाताने अप्पर इंदिरानगर भागात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली होती.