Breaking News

अधिकारी, कर्मचार्‍यांच्या बदलीमागे कोंडी करण्याचा संचालक मंडळाचा डाव

नाशिक, दि. 02, नोव्हेंबर - अधिकारी, कर्मचार्‍यांच्या बदलीमागे कार्यकारी संचालकांचीच कोंडी करण्याचा संचालक मंडळाचा डाव आहे अशी चर्चा जिल्ह्यात आहे. जिल्हा बँकेतील  शेतकरी कर्जमाफीच्या कामकाजात अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्याने अडथळा येत आहे. संचालक मंडळाची सभा मागील आठवडयात अध्यक्ष नरेंद्र दराडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.  शेतकरी कर्जमाफीची कार्यवाही प्रक्रीया सुरू असून, कार्यकारी संचालक राजेंद्र बकाल दिवाळीनिमित्त सात दिवसांच्या सुट्टीवर असल्याने त्यांच्या अनुपस्थिीत बँकेच्या चार  विभागातील प्रमुखांना प्रभारी पदभार घेण्याचे आदेश संचालक मंडळाने काढले होते. मात्र, सदर अधिकार्‍यांनी पदभार घेण्यास नकार दिल्याने संचालक मंडळाने तातडीने या चार अ धिकार्‍यांच्या बदल्या करण्याचा निर्णय बैठकीत घेतला होता. प्रभारी कार्यकारी संचालक नेमून त्यांच्याकडून बँकेतील कंत्राटी कर्मचार्‍यांना मुदतवाढ देण्याचा संचालक मंडळाचा डाव  होता. मात्र अधिकार्‍यांनी नकार दिल्याने हा डाव फसला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या संचालकांनी बदलीचे हत्यार उपसल्याची चर्चा कर्मचारी वर्गात आहे. असे असतानाच या अ धिकार्‍यांच्या बदल्या करून कार्यकारी संचालक बकाल यांचीही कोंडी करण्याचा संचालकांचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे. बकाल यांचे कामकाज चांगले असून ते कर्ज वसुलीसाठी  प्रयत्न करत आहेत. कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी बकाल यांच्याकडून सुरू आहे. यात संचालक मंडळाला डावलेले जात असल्याने त्यांच्याकडून अशी खेळी असल्याच्या चर्चे ला उधाण आले आहे.