Breaking News

4 व 5 नोव्हेंबरला नगरमध्ये विभागीय साहित्य संमेलनाचे आयोजन

अहमदनगर, दि. 02, नोव्हेंबर - महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सावेडी,उपेच्या वतीने दिनांक 4 व 5 नोव्हेंबर रोजी टिळक रोडवरील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात आयोजित  विभागीय मराठी साहित्य संमेलनात ग्रंथदिंडी, ग्रंथप्रदर्शन, उद्घाटन, कथाकथन, विविध विषयावरील परिसंवाद, कवी संमेलने, प्रकट मुलाखती, महाचर्चा, सांस्कृतिक कार्यक्रम, एकां किा सादरीकरण, पुरस्कार वितरण व समारोप अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 11.30 वाजता जेष्ठ कवी व महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वात्रटिकाकार  रामदास फुटाणे व संमेलनाध्यक्ष साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक प्रा.रंगनाथ पठारे यांच्या हस्ते या संमेलनाचे शानदार उद्घाटन होणार असल्याची माहिती संमेलनाचे  स्वागताध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांनी दिली.
शनिवारी 4 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता संमेलनाचे स्वागताध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते ग्रंथदिंडी सुरु होईल. सकाळी 11 वाजता विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण  विखे पाटील यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. या ग्रंथप्रदर्शनाच्या माध्यमातून वाचकांना सवलतीच्या दरात दर्जेदार,वाचनिय पुस्तकांची मेजवाणी मिळणार आहे.
संमेलनातील कार्यक्रमांची तपशिलवार माहिती देतांना स्वागताध्यक्ष नरेंद्र फिरोदिया म्हणाले कि, संमेलनाच्या पूर्व संध्येला म्हणजेच शुक्रवारी 3 नोव्हेबर रोजी सायंकाळी 7 वाजता  जेष्ठ कवी चंद्रकांत पालवे यांच्या अध्यक्षतेखाली व जेष्ठ कवी,लेखक टी.एन.परदेशी यांच्या प्रमुख उपस्थितीत नगर जिल्हा व विभागातील 50 कवींचा प्रातिनिधीक सहभाग असलेल्या  काव्यसंध्या या कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.या कवी संमेलनाचे सुत्रसंचलन कवयित्री प्रा.शर्मिला गोसावी व प्रा.गणेश भगत व संदिप काळे हे करणार आहेत.दुपारी  2.30 वाजता विनोदी कथा कथनकार डॉ.संजय कळमकर यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथन होणार आहे. सायंकाळी 5.30 वाजता प्रा.डॉ.लिला गोविलकर यांच्या अध्यक्षतेखाली  नगर जिल्ह्याचे साहित्यातील योगदान या विषयावरील परिसंवाद होणार आहे.
सायंकाळी 7 वाजता कवी संदिप खरे,गुरु ठाकूर,प्रा.दासू वैद्य,संजिवनी तडेगावकर आदी मान्यवरांचे कवी संमेलन होणार आहे.भरत दौंडकर हे या कवी संमेलनाचे सुत्रसंचलन क रणार आहेत.रात्री 9 वाजता झी.टी.व्ही वरील संगीतसम्राट व झी.सा.रे.ग.म.पा.लिटिल चॅम्प विजेत्या गायिका अंजली व नंदिनी गायकवाड यांचा मराठी हिंदी गीतांचा भक्तीभाव सरगम  हा कार्यक्रम होणार आहे.अंगद गायकवाड हे या कार्यक्रमाचे संगीत संयोजन करणार आहेत. तर प्रदीप गांधी यांची या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. रविवारी 5 नोव्हेंबर  रोजी सकाळी 9.30 वाजता जेष्ठ साहित्यिक व माजी खासदार यशवंतराव गडाख पाटील यांची प्रकट मुलाखत सुधीर गाडगीळ हे घेणार आहेत.संमेलनाचे स्वागताध्यक्ष व उद्योजक  नरेंद्र फिरोदिया यांची यावेळी प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.सकाळी 11.30 वाजता रामदास फुटाणे यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन होणार आहे.
दुपारी 12.30 वाजता आमची मराठी-आमची भूमिका या विषयावर महाचर्चा होणार आहे. सुधीर गाडगीळ हे महाचर्चेचे सुत्रसंचलन करणार आहेत.दुपारी 2.30 वाजता संवेदनशील  लेखिका दिशा शेख यांची प्रकट मुलाखत निलिमा बंडेलु घेणार आहेत. मसापचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. दुपारी 4 वाजता संदिप दंडवते  लिखित दिग्दर्शीत पुरुषोत्तम करंडक विजेती एकांकिका माईक चे सादरीकरण होणार आहे.योळी डॉ.व्ही.एन.देशपांडे व उद्योजक के.के.शेट्टी उपस्थित राहणार आहेत.सायंकाळी 5.30  वाजता संमेलनाध्यक्ष रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली या संमेलनाचा समारोप तसेच शांतीकुमारजी फिरोदिया स्मृती साहित्य पुरस्कार वितरण होणार आहे.