Breaking News

माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांच्यासह 27 जणांना जामीन मंजूर

बीड, दि. 02, नोव्हेंबर - बीड जिल्हा बँकेच्यावतीने माजीमंत्री शिवाजीराव पंडित यांच्यासह इतर 27 जणांना बीड जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयात अंतरीम  जामीन मंजुर करण्यात आला. जामीन मिळाल्याचे समजताच गेवराईसह बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आनंद व्यक्त करण्यात आला. गेवराई येथे फटाके आणि तोफा वाजवून  न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांच्यावतीने अ‍ॅड.बाळासाहेब कोल्हे यांनी काम पाहिले.
शिवाजीराव पंडित व जयभवानी सहकारी साखर कारखान्याच्या इतर संचालकांविरुध्द बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने सन 2005 मध्ये मागणी केलेल्या कर्जासोबत  बनावट कागदपत्रे देवून फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. जयभवानी सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरु होत असताना केवळ राजकीय  द्वेषातून हा कारखाना सुरु होवू नये म्हणून विरोधकांनी हा गुन्हा दाखल केल्याची चर्चा जिल्हाभर होती. गेवराई शहरासह इतर ग्रामीण भागात ग्रामस्थ व व्यापा-यांनी आपले व्यवहार  बंद ठेवून या घटनेचा निषेध केला.