शेतक-यांनी नाफेडच्या ग्रेडरला कोंडले
नांदेड, दि. 03, ऑक्टोबर - नाफेडद्वारा उडीद खरेदी करीत असलेल्या केंद्रावर जाचक अटीला कंटाळून शेतक-यांनी नाफेडचे ग्रेडर पी. एस. हंपोले यांच्या केबीनला धमार्बाद कृषी उत्पन्न बाजार समितीत कोंडून बाहेरून कुलूप ठोकले. येथील नाफेडने एक महिन्यात फक्त पाच शेतक-यांचे 40 क्विंटलच उडीद खरेदी केले. अनेक शेतक-यांचे आणलेले उडीद क ाही कारणे दाखवत परत केले. यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे काल शेतक-यांनी सामान फेकून दिले आणि ग्रेडरला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात कोंडून टाकले. नंतर पोलिसांनी ग्रेडरला बाहेर काढले.
