डेरवणच्या ईशा पवारचा सुवर्ण हॅटट्रिकचा पराक्रम
रत्नागिरी, दि. 03, ऑक्टोबर - डेरवण (ता. चिपळूण) येथील विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट - एसव्हीजेसीटी स्पोर्टस् अॅकॅडमीच्या ईशा पवारने लक्षवेधी कामगिरी करीत मिनी गटाच्या राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत सलग तिसर्या वर्षी सुवर्ण पदकाचा पराक्रम केला. ईशाच्या अचूक नेमबाजीच्या जोरावर सांघिक गटातही डेरवण संघाने पदकाची कमाई केली. आंध्र प्रदेशमधील विजयवाडा येथे संपलेल्या दहाव्या राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत डेरवणच्या एसव्हीजेसीटी स्पोर्टस् अॅकॅडमीच्या ईशा पवारने दोन सुवर्ण आणि दोन कास्य पदके जिंकून पदक ांचा चौकार झळकविला. सांघिक गटात रिया पोकळे, मृणल सकपाळ यांनी कास्य पदक पटकवले. यापूर्वी विजयवाडा आणि तिरुपती येथे झालेल्या स्पर्धेतही ईशाने सुवर्णपदकाचा करिश्मा घडविला होता. आर्चरीतील कम्पाऊंड प्रकारात असे यश संपादन करणारी ईशा ही कोकणातील पहिलीच सुवर्णकन्या ठरली आहे.
मानांकन प्रकारात ईशाने 50 मीटरमध्ये पहिल्या फेरीत 329 तर दुसर्या फेरीत 327 असे एकूण 655 गुणांची खेळी करीत सुवर्णपदकावर महाराष्ट्राचे नाव कोरले. या स्पर्धेत यजमान आंध्र प्रदेशसह दिल्ली, हरियाणा, तेलंगण, मणिपूर, तामिळनाडूसह देशातील विविध राज्यांमधून दीडशेपेक्षा अधिक राज्यस्तरीय विजेत्यांनी सहभाग घेतला होता. आत्मविश्वासाने आपल्या लौकिकला साजेसा खेळ करीत ईशाने महाराष्ट्राची शान सलग तिसर्यांदा उंचविली.
मिश्र प्रकारात प्रथमेश जावकरच्या साथीने ईशाने महाराष्ट्राला स्पर्धेतील दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले. कंपाऊड गटातील सांघिक स्पर्धेतही जय महाराष्ट्राचे सूर ननादले. ईशा पवार, रिया पाकळे, मृणाल सपकाळ आणि समीक्षा धामणकर यांनी बलाढ्य मणिपूरच्या मुलींना पराभूत करून कास्य पदक खेचून आणले. ईशाने इलिमेशन प्रकारातही पदकाचा वेध घेतला. तेलंगणाच्या मुलीला मागे टाकून ईशाने चौथे पदक संपादन केले. एसव्हीजेसीटी स्पोर्टस अॅकॅडमीच्या मैदानात कुशल प्रशिक्षक ओंकार घाडगे यांच्या मार्गदर्शनाद्वारे सराव क रणार्या डेरवणच्या मुलींनी राष्ट्रीय स्पर्धेत आपल्या यशाची कमान उंचावत नेली आहे. एसव्हीजेसीटीचे काका महाराज जोशी, विकास वालावलकर, संचालक श्रीकांत पराडकर यांनी धनुर्विद्या खेळाचे नवे क्षितिज कोकणातील मुलांसाठी चार वर्षांपूर्वी खुले केले. पहिल्याच स्पर्धेपासून धनुर्विद्या खेळातील कम्पाऊंड प्रकारातील यश जिंकणारा डेरवणचा संघ असे समीकरण जुळून आले आहे.