Breaking News

नाभिक समाजातर्फे मुख्यमंत्रांचा निषेध

नाभिक समाजाच्या भावना दुखावतील, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी केल्याच्या निषेधार्थ राहुरी तालुक्यातील नाभिक समाजाच्यावतीने दुकाने बंद ठेवून तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आज नाभिक समाजाच्यावतीने दुकाने बंद ठेवून आंदोलन करण्यात आले. 


मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाभिक समाज्याची नाभिक समाज्याच्या भावना दुखवल्या आहेत. त्याच प्रमाणे त्यांनी नाभिक समाजाची जाहीर माफी मागावी अशी मागणी असून, जोपर्यंत मुख्यमंत्री जाहीर माफी मागत नाहीत तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहणार असून काळ्या फिती लावून काम करणार असल्याचा निर्धार समाजबांधवांनी केला आहे. मुख्यमंत्र्याचे निषेध पत्रके दुकानात लावण्यात येणार आहेत.

 यावेळी आंदोलनात नाभिक महामंडळाचे नगर जिल्हा उपाध्यक्ष भाउसाहेब बिडवे, प्रसाद कोरडे, सुजित कोरडे, किशोर दुधाडे, सुनिल कोरडे ,मंगेश दुधाडे, अनिल वाघचौरे, सतिश कोरडे, उमेश कोरडे, देविदास बिडे, पप्पु कोरडे, संजय थोरात, लक्ष्मण चौधरी, सुजित तुपे, प्रशांत विश्वासराव, आण्णासाहेब बिडे, मयुर गवळी,बाबा बिडे,सरोज तुपे, निखिल तुपे, नवनाथ औटी, अविनाश यादव, लक्ष्मण राउत, सागर रंधवे आदी सहभागी झाले होते.