जाहिरातींवर खर्च करणार्या सरकारकडे विकासासाठी निधी नाही - उद्धव ठाकरे
रत्नागिरी, दि. 16, नोव्हेंबर - राज्य सरकारकडून जाहिरातींवर अनावश्यक खर्च केला जात आहे आणि निधीअभावी जिल्हा परिषदेची विकासकामे होत नाहीत. निवडणुकीत भाजपला कोकणात भोपळा मिळाला म्हणून कोकणावर सरकारकडून सूड उगवला जात आहे, असा आरोप शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज येथे केला. जनतेच्या मुळावर कोण येणार असेल, तर सरकारला खाली खेचल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात ठाकरे बोलत होते.
ते म्हणाले की, यांना आम्ही मोठे केले. जो कोणी माझ्या स्वराज्यावर चालून येईल, त्याचा खात्मा झालाच पाहिजे. आंबा उत्पादकांनी निवेदन दिले.
येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात ठाकरे बोलत होते.
ते म्हणाले की, यांना आम्ही मोठे केले. जो कोणी माझ्या स्वराज्यावर चालून येईल, त्याचा खात्मा झालाच पाहिजे. आंबा उत्पादकांनी निवेदन दिले.
कर्जमुक्ती योजना कोकणातील किती लोकांना मिळाली माहिती नाही. सगळेच्या सगळे शेतकरी कर्जमुक्त झाले पाहिजेत, हे स्वप्न आहे. पण ते होणार नसेल तर कर्जमाफी योजनेला शिवरायांचे नाव देणे योग्य नाही. आंबा उत्पादकांना व्याजमाफीचे आश्वासन दिले. ते पूर्ण झाले नाहीच, उलट चक्रवाढ व्याज वाढत आहे. आंबा हंगाम सुरू झाला असताना कीटकनाशकांवर बंदी घातली गेली.
या आंब्याची चव जग चाखतेय. ते बागायतदारांचे कष्ट आहेत. त्याच आंब्याला कीड लागली तर बागायतदार काय करणार? शिवरायांना जाहिरात करावी लागली नाही. संशोधकांना माझे सांगणे आहे की, त्यांनी याचा शोध घ्यावा. सरकार शिवशाही योजनेच्या जाहिरातीवर कोट्यवधी खर्च करतेय. जिल्हा परिषदेला का निधी देत नाही? त्याला शिवसेनेने विरोध केला की आम्ही दुतोंडी म्हणून ओरड करायची. कोकणातील ज्या नागरिकांनी, माता-भगिनींनी शिवसेनेच्या आमदाराला, जिल्हा परिषद सदस्याला निवडून दिले, त्यांच्या विकासकामांसाठी निधी दिला जात नाही. त्रास दिला जातो.
व्हॉट्सपवर सध्या एक संदेश फिरतोय. अच्छे दिन तो आये हे, मगर दिल्ली में प्रदूषण है, इसलिए दिखाई नही दे रहे है। ही गोष्ट खरीच आहे. विकासाची वाट धुक्यात हरवली आहे. ती वाट नव्हे, विल्हेवाट आहे, अशा शब्दांत पंतप्रधानांचीही खिल्ली उडवून ठाकरे म्हणाले, गुजरात निवडणुका जवळ आल्यानंतर जीएसटी कमी करण्याचा निर्णय झाला. सुदैवाने ते पुन्हा निवडून आले तर त्यांचा सुशीलकुमार शिंदे होईल.
शिंदे यांनी 1999 ला असेच केले. शिवसेनेने शेतक-यांना वीजबिलमुक्तीची हाक दिली. त्याची अंमलबजावणी करत शिंदे यांनी शेतक-यांची बिले माफ केली. पुन्हा सत्ता आल्यानंतर वीज बिले वाढवून येऊ लागली. हीच स्थिती गुजरातच्या निवडणुकीनंतर होऊ शकते. गुजरातमध्ये पन्नास सभा पंतप्रधानांनी घेतल्या. त्यामुळे तिथे सत्ता येण्याची शक्यता आहे. तेथील जनता सुज्ञ आहे, ते नक्कीच विचार करून मतदान करतील. शिवसेना सत्तेत राहूनही जनतेसोबतच राहणार, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
यावेळी नियोजित तारांगणचे तीन मिनिटांचे सादरीकरण करण्यात आले. या तारांगणात थ्रीडी शो, मिनी सायन्स थिएटर उभारले जाणार आहे. विज्ञानविषयक कार्यक्रम येथे घेण्यात येणार आहे. कोकणात येणा-या पर्यटकांसाठी ही पर्वणी ठरेल. त्याला जिल्हा नियोजनमधून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे, असे यावेळी सांगण्यात आले. बाळासाहेब ठाकरे उद्यानात हे तारांगण उभारण्यात येणार आहे.
खासदार राऊत, पालकमंत्री वायकर, आमदार सामंत आणि नगराध्यक्ष पंडित यांच्यामुळे हा प्रकल्प मार्गी लागल्याचे स्पष्ट करण्यात आले. पूर्वीच्या योजनेनुसार तारांगण त्या जागेत होऊ शकत नव्हते; मात्र त्यात बदल करुन ते मंजूर करून आणण्यात आले.
त्याचे उद्घाटन उद्धवजी ठाकरे यांच्याच हस्ते व्हावे, यादृष्टीने प्रयत्न सुरू केल्याचे पालकमंत्री वायकर यांनी स्पष्ट केले. जिल्हा परिषदेला निधी नाही. जिल्हा नियोजनात क पात केली जात आहे. अशा परिस्थितीत पक्षाने भूमिका घेऊन निधी आणण्यासाठी मुख्यमंत्री स्तरावर प्रश्न लावून धरला पाहिजे, अशी सूचना त्यांनी याप्रसंगी केली.
