उपराष्ट्रपतींनी घेतले हेडगेवारांच्या समाधीचे दर्शन
नागपूर, दि. 11, नोव्हेंबर - भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आज, शुख्रवारी नागपुरातील हेडगेवार स्मृतिमंदिराला भेट दिली. यावेळी त्यांनी आद्यसरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि गोळवलकर गुरूजी यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले. विशेष म्हणजे हेडगेवार स्मृतीमंदिराला भेट देणारे ते पहिले उपराष्ट्रपती आहेत.
नागपुरातील रेशीमबाग मैदानावर आयोजित अॅग्रोव्हीजन कृषी प्रदर्शनाच्या शुभारंभ कार्यक्रमानंतर उपराष्ट्रपतींचा ताफा शेजारी असलेल्या डॉ. हेडगेवार स्मृती मंदिराकडे वळला. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय रस्ते व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री महादेव जानकर देखील उपस्थित होते.