Breaking News

नाशिकातील धार्मिक स्थळे हटविण्याच्या निषेधार्थ बुधवारी सर्वधर्मीय बंद

नाशिक, दि. 08, नोव्हेंबर - महानगरपालिकेच्या अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याच्या निषेधार्थ उद्या सर्वधर्मीय धार्मिक संघटनांकडून नाशिक बंदची हाक देण्यात आली आहे.  शहरात आज,मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत सर्वधर्मीय संघटनांनी हा निर्णय घेतला आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशाचा विपर्यास करून महापालिकेने शहरातील धार्मिक स्थळांचे चुकीचे सर्वेक्षण केले असल्यामुळेत्याचा निषेध म्हणून लोकशाही मार्गाने उद्या नाशिक बंदची  हाक दिली असल्याची माहिती संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी यावेळी केली.
2009 नंतर काही मंदिरे बांधण्यात आली आहेत त्यांना अनधिकृत ठरवत मनपाकडून आजपर्यंत 150 धार्मिक स्थळे हटविण्यात आली आहेत.1960 नंतर बांधलेल्या मंदिरांवर  मनपाची कारवाई अत्यंत चुकीची असून न्यायालयाकडून ठराविक वर्ष आपल्या आदेशात नमूद केलेले नाहीत.
स्थानिक नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन धार्मिक स्थळांवर कारवाई करू नये. तसेच ज्या परिसरात धार्मिक स्थळांबाबत तक्रारी नाहीत अशा मंदिरांवर कारवाई करू नये असे  सर्वधर्मीय धार्मिक संघटनांतर्फे सांगण्यात आले आहे.