वादग्रस्त लेखाप्रकरणी अभिनेता कमल हसन विरोधात जनहित याचिका दाखल
वाराणसी, दि. 05, नोव्हेंबर - अभिनेता कमल हसनच्या वादग्रस्त लेखाप्रकरणी त्याच्याविरोधात जनहित याचिका वाराणसीत दाखल करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशच्या शिवपूरमधील वकील कमलेश चंद्र त्रिपाठी यांनी ही याचिका दाखल केली आहे.
त्रिपाठी यांनी कमल हसनच्या तामिळ साप्ताहिकात प्रकाशित लेखावर तीव्र आक्षेप घेतला आहे. तसेच हिंदू संघटनांना दहशतवादी संघटना संबोधल्याने त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही केली आहे. स्थानिक न्यायालयाने ही याचिक दाखल करुन घेतली असून, या प्रकरणी 22 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. दाक्षिणात्य अभिनेता आणि राजकारणात प्रवेश करण्याच्या तयारी असलेल्या कमल हसनचा नुकताच तामिळ भाषिक साप्ताहिक आनंदा विकटनमध्ये एक लेख प्रकाशित झाला. या लेखात त्याने उजव्या विचारसरणीच्या संघटनांमध्ये दहशतवाद बोकाळत असल्याचं म्हटलं होतं.