Breaking News

2 लाख 24 हजार कंपन्यांना टाळं

नवी दिल्ली, दि. 05, नोव्हेंबर - नोटाबंदीनंतर आर्थिक गैरव्यवहार करणार्‍या तब्बल 2 लाख 24 हजार कंपन्यांना केंद्र सरकारनं टाळं ठोकलं आहे. सरकारच्या कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाकडून ही कारवाई करण्यात आली.
या अंतर्गत 35 हजार कंपन्यांची झडती घेण्यात आली. या कंपन्यांची एकूण 58 हजार खाती होती. या सर्व खात्यांमधून तब्बल 17 कोटी रुपयांचे आर्थिक व्यवहार करण्यात आले होते. विशेष म्हणजे, या सर्व कंपन्यांचं कामकाज गेल्या 2 वर्षांपासून बंद होतं. सरकारला याबाबत एकूण 56 बँकांनी माहिती दिली होती. त्यानंतर आर्थिक गैरव्यवहार करणार्‍या तब्बल 2 लाख 24 हजार कंपन्यांना टाळं ठोकलं.