Breaking News

वास्तवतावादी सिनेमा नाकारणे हे दुर्दैवी चित्र - पद्मश्री गिरीश कासारवल्ली


नाशिक, दि. 23, नोव्हेंबर - आपल्या देशातच नव्हे तर जगात देखील वास्तवतावादी अर्थात पुरावा, सत्य पडताळणी करून निर्मित होणारे माहितीपट, सिनेमाला नेहमीच दडपण्याचा प्रयत्न होत आला आहे. विशेष म्हणजे जगात किमान वास्तवतावादी सिनेमा दाखवला तरी जातो. आपल्याकडे मात्र तो थेट नाकारलाच जातो. हे अत्यंत दुर्देवी चित्र असल्याची खंत राष्ट्रीय पुरस्कार विजेते पद्मश्री गिरीश कासारवल्ली यांनी बोलून दाखवली आहे. अभिव्यक्ती, मिडीया फॉर डेव्हलपमेंट, नाशिक यांच्याकडून आयोजित 6 व्या अंकुर फिल्म फेस्टीव्हलच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. 

शहरातील कुसुमाग्रज स्मारकात 6 व्या अंकुर फिल्म फेस्टीव्हला थाटात सुरुवात झाली आहे. चार दिवस चालणार्‍या ह्या फेस्टीव्हलचे उद्घाटन कासारवल्ली यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ‘6 व्या अंकुर’ फेस्टीव्हलचे फेस्टीव्हलचा लोगो आणि स्मृतीचिन्ह यांचे अनावरण त्यांच्या हस्ते करण्यात आले. तर इगतपुरी तालुक्यातील शेनवड गावाचा पाणी प्रश्‍नावर तयार करण्यात आलेला समुदाय व्हिडीओ दाखवून फेस्टीव्हलचा शुभारंभ करण्यात आला.

भारतात दोन प्रकारचे सिनेमा बनविले जातात. एक वास्तवतावादी आणि कल्पनाविलासी स्वरूपाचा सिनेमा असतो. यामध्ये वास्तवता दाखवणारा सिनेमा नेहमीच नाकारला जातो. ह्या सिनेमाला लोकांपर्यंत पोहोचण्यासाठीच झगडावे लागत असल्याचे मत कासारवल्ली यांनी व्यक्त केले आहे. 

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी दैनिक लोकमंथन चे फेसबुक पेज लाईक आणि ट्विटर वर फॉलो करा