सांगली जिल्हा पोलिस प्रशासनाच्या अकार्यक्षमतेचे निघाले धिंडवडे
सांगली, दि. 23, नोव्हेंबर - सांगली जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारीमार काळम- पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित बैठकीत नागरिक व विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगली जिल्हा पोलिस प्रशासनाच्या अकार्यक्षमतेचे धिंडवडे काढले.
सांगली जिल्ह्यात घडत असलेल्या विविध घटनांमुळे सर्वसामान्य नाग रिक भयभीत झाला आल्याचा आरोप करीत अनेकांनी वाढत्या गुन्हेगारीबाबत चिंता व्यक्त केली.शिवसेनेचे युवा नेते सांगली महापालिकेतील नगरसेवक शेखर माने यांच्या पुढाकाराने विजयकुमार काळम- पाटील यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीस सांगली महापालिका आयुक्त रविंद्र खेबूडकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण व संजयसिंह चव्हाण आदी उपस्थित होते.
गत आठवड्यात संपूर्ण महाराष्ट्र हादरवून सोडलेल्या अनिकेत कोथळे हत्या प्रकरणासह सांगली जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी, भुरट्या चोरी व घरफोड्या आदी विषयावर उपस्थित सर्वांनीच पोलिस अधिकार्यांना चांगलेच धारेवर धरले. त्यावर मिरज शहर पोलिस उपअधिक्षक धीरज पाटील यांनी पोलिस प्रशासनाच्यावतीने बाजू मांडण्याचा केविलवाणा प्रयत्न के ला, तर सांगली शहर पोलिस उपअधिक्षक डॉ. दीपाली काळे यांनी गत काही दिवसात घडलेल्या घटनेबाबत आपण आत्मपरिक्षण करीत असल्याची कबुली दिली.
शेखर माने यांनी सांगली जिल्ह्यात गुन्ह्यांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. पोलिस प्रशासन व नागरिक यांच्यात संवाद नाही. तक्रार देण्यास गेलेल्या नागरिकांना सौजन्याची वागणूकदेखील मिळत नाही. उलट तपासाची कटकट नको म्हणूनच तक्रार नोंदवून न घेण्याकडे पोलिसांचा कल असतो. कित्येक गुन्ह्यांची पक्की नोंदही होत नाही. नवा पोलिस अधिकारी आला की काहीकाळच पोलिसांमध्ये कार्यक्षमता उत्पन्न होते, अशी टीका केली.

व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा म्हणाले, की सध्या पेट्रोलिंग हा प्रकारच कमी होत चालला आहे. काही ठिकाणी रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग करण्यात येत असले तरी दिवसा सर्वत्र शांतताच असते.
सांगली जिल्हा सराफ असोसिएशनचे कार्याध्यक्ष किशोर पंडित यांनी सराफ पेठेत पोलिस चौकीची उभारणी करण्यात आली आहे. मात्र सध्या त्या ठिकाणी काहीकाळच पोलिस असतात. तिथे पूर्णवेळ पोलिस असणे गरजेचे आहे. आठवडा बाजाराची व्याप्ती वाढत चालली आहे. त्यामुळे भुरट्या चो-यांच्या प्रकरणात वाढ होत असून अनधिकृत फेरीवाल्यांमुळे वाहन पार्किंगचा विषयही गंभीर बनत असल्याकडे लक्ष वेधले.