Breaking News

पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीला जन्मठेप.

ठाणे, दि. 23, नोव्हेंबर - जव्हार तालुक्यात आदिवासी भागातील विनू कडाली या आरोपीस पत्नीची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी जिल्हा न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी सश्रम जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच 10 हजाराचा दंडही ठोठावला आहे. 



जव्हार तालुका आदिवासी भागात राहणारा आरोपी कडाली याने 16 एप्रिल,2015 रोजी शुल्लक कारणावरुन भांडण करत पत्नी सोमी हिच्या डोक्यात टणक वस्तू मारली. यात तिचा मृत्यू झाल्याचे समजताच त्याने ही घटना गावच्या सरपंचांना सांगितली. त्यानंतर सरपंचाने त्वरित घटनेची माहिती पोलिसांना दिल्यामुळे पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतक सोमीचा मृतदेह ताब्यात घेऊन आरोपी विनू याला अटक केली.