Breaking News

कायनेटीक चौकातील जुगार अड्यावर छापा

अहमदनगर, दि. 01, नोव्हेंबर - विना परवाना बेकायदेशीररित्या पत्याच्या हरजितीचा जुगार चालविणार्‍या अड्डयावर कोतवाली पोलिसांनी छापा टाकून येथे एक लाख चौसष्ट हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन दहा जणांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई कायनेटीक चौकातील विजय गॅरेजच्या शेजारील पत्र्याच्या बंद खोलीत मंगळवारी (दि. 31) पहाटे अडीच वाजता केली.
या कारवाईत भाऊ गाडे (रा.सिध्दी विनायक कॉलनी, सावेडी), किरण लक्ष्मण चाबूकस्वार (रा. माळीवाडा), मायकल पेापट शिंदे (रा.भांबळगल्ली, बुरुडगाव रोड), जावेद इब्राहिम शेख (रा. आशा टॉकीज चौक), विनायक गणेश होनराव (रा. पारशाखुंट), संतोष ज्ञानेश्‍वर काटपीलवार (कायनेटीक चौक), प्रमोद अशोक कांबळे (रेल्वे स्टेशन), रामदास विश्‍वनाथ शिंदे (माळीवाडा) सुरेश शिवराम नन्नवरे (कायनेटिक चौक), शेख रज्जाक अब्दुल सौदागर (रा. तख्ती दरवाजा) यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील एकूण 8 मोबाईल, अ‍ॅक्टीव्हा मोपेड (क्र. एमएच 16 ए एक्स 5199), हिरो एचएफ डिलक्स मोटारसायकल (क्र. एमएच 16 बीएफ 1322) आणि 96 हजार 745 रोख रक्कम, पत्ते जुगाराची साधन असा मोठा मुद्देमाल जप्त केला.
कारवाईदरम्यान जुगार अड्डा चालविणारा फैरोज खान (रा. आशा टॉकीज चौक) हा पळून जाण्यात यशस्वी झाला.