न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करा अन्यथा खटल्यांना सामोरे जा - राज ठाकरे
मुंबई, दि. 05, नोव्हेंबर - उच्च न्यायालयाने फेरीवाल्यांसंदर्भात दिलेल्या निर्णयानुसार कारवाई करा अन्यथा न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्याबद्दल अवमानना खटल्याला सामोरे जा, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज येथे दिला. मनसेच्या पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते.
उच्च न्यायालयाने फेरीवाल्यांसंदर्भात दिलेल्या निर्णयाची प्रत पोलीस, महापालिका व रेल्वे स्थानक व्यवस्थापनाला देऊन कारवाई करण्याची मागणी मनसेकडून लवकरच केली जाणार आहे. या आदेशानुसार कारवाई न केल्यास संबंधित अधिका-यांवर न्यायालयाच्या आदेशाचे अवमान केल्याचा खटला दाखल करू. त्यानंतरही फेरीवाले रस्त्यावर बसल्याचे दिसल्यास यापुढे जोडलेले हात सोडायला लावू नका, असा इशाराही श्री. ठाकरे यांनी दिला.
फेरीवाल्यांविरोधात केलेल्या आंदोलनात ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला. ज्यांच्यावर खटले दाखल करण्यात आले. त्या सर्वांचे अभिनंदन ठाकरे यांनी केले. एकीकडे पोलीस मनसेच्या मुलांवर खटले, गुन्हे दाखल करत आहे. पण दुसरीकडे पोलिसांना होणा-या मारहाणीत त्यांचेच संरक्षण मनसेचे कार्यकर्ते करत आहेत. त्यामुळे पोलिसांनी आपले कोण हे लक्षात घ्यावे, असेही अप्रत्यक्षरित्या पोलिसांना सुनावले.