नोटाबंदीच्या वर्षपूर्तीला काँग्रेस पाळणार काळा दिवस - माणिकराव ठाकरे
पुणे, दि. 05, नोव्हेंबर - नोटाबंदीच्या निर्णयाचा सर्वसामान्य जनतेला मोठा फटका बसला असून देशाची अर्थव्यवस्था त्याचे गंभीर दुष्परिणाम भोगत आहे. त्यामुळे या निर्णयानंतर झालेला जनतेचा आक्रोश सरकारपर्यंत पोहचविण्यासाठी येत्या 8 नोव्हेंबरला देशभरात काँग्रेसच्या वतीने काळा दिवस पाळला जाणार असल्याचे विधानपरिषदेचे उपसभापती माणिक राव ठाकरे यांनी शनिवारी पुण्यात सांगितले. नोटबंदीनंतर देशभरात घडलेल्या विविध घडामोडीवर रेखाटलेल्या व संकलित केलेल्या व्यंगचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका करत या निर्णयाच्या निषेधार्थ लोकशाही मार्गाने जन आंदोलने उभारली जाणार असल्याचेही ठाकरे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
सारसबागेजवळील दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कलादालनात हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.
ठाकरे म्हणाले की, या निर्णयाचा सर्वसामान्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे जनतेला गेल्या वर्षभरात अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. त्यानंतरही जनतेचे हित जोपासल्याचे सांगणार्या सरकारला जनतेचा आक्रोश दिसत नाही.
या निर्णयामुळे बँकांच्या बाहेर लांबच्या लांब रांगा लागल्या, नोटबंदीच्या निर्णयानंतर दोन महिन्यामध्येच 15लाख नागरिक बेरोजगार झाले, शेतकरी, कामगारवर्ग हवालदिल झाला, अशा अनेक घटना घडल्या. नोटबंदी हा आर्थिक भूकंप असून या निर्णयामुळे देशाच्या विकास दरात दोन टक्के घट झाली आहे. औद्योगिक क्षेत्रात मंदी आल्यामुळे व्यापारी वर्ग नाराज झाला असून कामगारांना बुरे दिन आले असल्याची टीका ठाकरे यांनी केली. मोदी सरकारने घेतलेल्या या घातक निर्णयामुळे समाजातील प्रत्येक घटकाचेच नुकसान झाले असल्याचा आरोपही ठाकरे यांनी यावेळी बोलताना केला.