नाशिक जिल्ह्यातील चंदपुरी गावात दारूबंदी; महिला शक्तीचा विजय
मुंबई, दि. 05, नोव्हेंबर - मालेगाव तालुक्यातील (जि. नाशिक) चंदपुरी गावात दारूबंदी करण्यासाठी घेतलेल्या निवडणुकीत 1 हजार 237 पैकी 1 हजार 111 महिलांनी दारू बंदीच्या बाजूने मतदान केले. यावरून या निवडणुकीत महिला शक्तीचा विजय झाला.
या गावची सुमारे 2 हजार 500 लोकसंख्या आहे. हे गाव खंडोबाच्या मंदिरामुळे राज्यभर प्रसिद्ध आहे. अशा तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी दारूची 16 दुकाने आहेत. यातून गावातील तरुण पिढी दारूच्या आहारी जात असल्याचे महिला वर्गाचे म्हणणे होते. त्यामुळे ही दुकाने बंद करण्याची मागणी जोर धरू लागली. त्यामुळे या संदर्भात निवडणूक घेण्यात आली व दारू बंदी करण्याच्या बाजूने सर्वाधिक कौल दिसून आला. निकाल जाहीर झाल्यावर महिलांनी एकच जल्लोष केला.