आंतरजातीय विवाह केल्याने मामाची भाचीस मारहाण.
पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की , दि २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० वा जामखेड शहरातील मेनरोडवरील एका जनरल स्टोअर्स समोर फिर्यादी व तिची भावजय उभी असतांना आरोपी दिपक आशोक चव्हाण (तपनेश्वर गल्ली) हा मोटारसायकलवरून तेथे आला . आणि फिर्यादीस म्हणाला की तूझ्या भावाने माझ्या भाचीला पळवून नेऊन लग्न केले. असे म्हणत फिर्यादीच्या हाताला धरून ओढत नेत म्हणाला की आता मी तूला पळवून नेऊन लग्न करीन . आणि तूला मारीन असे म्हणत शिवीगाळ करून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन त्यांनी केले . साक्षीदार व फीर्यादीस मारहाण केली, असे फिर्यादीने आपल्या दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान जामखेड शहरातील रमेश खाडे नगर भागातील मूलीचे व रोहित राऊत यांचे परस्परावर प्रेम असल्याने त्यांनी दि २१/६/२०१७ रोजी येथे नोंदणी पध्दतीने आंतरजातीय विवाह केला होता. याचा राग आरोपीच्या मनात घोळत होता. यामुळे तो वारंवार नातेवाईकांना शिवीगाळ करत मारहाण करण्याची धमकी देत होता. त्याअनुषंगाने हा प्रकार घडला असल्याचे समोर आले आहे.
आरोपी दीपक चव्हाण हा फरार झालेला आहे. पोलीस उपाधिक्षक सोनाली कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पो काँ बी आय गव्हाणे या प्रकरणांचा पूढील तपास करत आहेत.