Breaking News

या माकडाला लागलय पेट्रोलचं व्यसन.


नवी दिल्ली: हरियाणातील पानिपतमधील एक माकड अजबच आहे.हे माकड तहान लागल्यानंतर पाणी नाही तर थेट पेट्रोल पितं. या माकडाला चक्क पेट्रोल पिण्याचं व्यसन लागलं आहे. पानिपत परिसरात पार्किंगला लावलेल्या बाईकमधील पेट्रोल दररोज गायब होत होतं. याबाबत वाहनचालकांनी अधिक चौकशी केली असता, त्यांना आश्चर्यकारक चित्र दिसलं.
एक माकड चक्क पेट्रोलची पाईप काढून थेट पेट्रोल पित असल्याचं दिसलं.या माकडाच्या सवईबाबत स्थानिकांनी अधिक माहिती घेतली असता, हे माकड नेहमीच गाड्यांमधील पेट्रोल पित असल्याचं समजलं. हे माकड अन्य माकडांप्रमाणे शेंगा किंवा अन्य फळं खात नाही, पण पेट्रोल पितं.