Breaking News

खर्डा बसस्थानकची मोठी दुरवस्था.


जामखेड/ ता.प्रतिनिधी/- जामखेड तालुक्यातील ऐतिहासिक खर्डा गावच्या बसस्थानकाची मोठी दुरावस्था झालेली आहे. या बसस्थानकासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांनी ७४ लाखाचा निधी मंजुर केला. तरी देखील अद्दयापही या कामास सुरुवात झालेली नाही. 

बसस्थानक असुन ही त्याचा काहीच फायदा जनतेला होतांना दिसत नाही. कारण ते खुपच धोकादायक झालेले आहे . बस्थानकाचे छत हे कधीही तिथे प्रवाशी बसल्यावर त्यांच्या अंगावर पडू शकते. एवढी जर्जर अवस्था ही त्या खर्डा बसस्थानकची झालेली आहे. एखाद्या प्रवाश्याचा जीव गमवल्या नंतरच खर्डा चे बसस्थानक चे नवीन बांधकाम सुरु करायचे का? असा सवाल खर्डा चे नागरिक व प्रवाशी शासनाचे वरीष्ठ अधिकारी यांना विचारत आहे. बसस्थानकात घाण दुर्गंधी येत असल्याने प्रवाशी तेथे थांबत नाही. 


 प्रवाशी यांना कोणत्याही दुकानासमोर किंवा रस्त्यावर थांबावे लागत आहे. सर्वात जास्त खर्डा च्या बसस्थानकवर महिलांची खुप गैरसोय होत आहे. कारण तिथे पिण्याच्या पाण्याची सोय नाही, शौचालयची सोय नाही. मग महिलांनी हे कोणाला सांगायचे? सहा महिन्यापूर्वी या कामाचे भूमीपूजन समारंभ महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा . राम शिंदे यांच्या हस्ते मोठ्या थाटात संपन्न झाले होते.

परंतु आजपर्यंत निविदा निघुनही काम घेण्याच्या अंतर्गत वादामुळे या बसस्थानकाच्या कामाचा श्रीगणेशा झालाच नाही.त्यामुळे प्रवाशांना, नागरीकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.महिलांची मोठी कुचंबना होत असुन स्वच्छतागृह नसल्याने त्यांची खूपच गैरसोय होत आहे.बसस्थानकात पिण्याच्या पाण्याची सोय नाही.प्रशस्त स्वच्छतागृह नाही, परिसरात घाणीचे साम्राज्य असल्याने मोठी दूर्गंधी येते.खर्डा बसस्थानक आवारात डांबरीकरण नसल्याने मोठ्या प्रमाणात पाणी साठुन चिखल तयार झाला आहे.

प्रवाशांना या समस्येला तोंड द्यावे लागते.याठिकाणाहून शिर्डी हैद्राबाद राज्यमार्ग गेल्याने तसेच तुळजापूर, शिर्डी, बालाजी इ.देवस्थानसाठी हाच प्रमुख मार्ग असल्याने येथे नेहमी वर्दळ असते.त्यामुळे खर्डा बसस्थानकाचे काम जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी लक्ष घालून तातडीने काम सुरु करावे. अशी प्रवासी वर्गातुन व खर्डा ग्रामस्थांकडुन मागणी होत आहे. खर्डा बसस्थानकासाठी७४ लक्ष मंजुर झाले . या कामात प्रशस्त बस स्थानक, बैठक व्यवस्था,स्वतंत्र स्वच्छतागृहाची व्यवस्था,बसस्थानक परिसरात डांबरीकरण व संरक्षक भिंत अशी कामे होणार आहेत