Breaking News

काकडी विमानतळ नामविस्तार स्वाक्षरी आंदोलनाला प्रतिसाद

अहमदनगर, दि. 2, नोव्हेंबर - कोपरगावच्या देशभक्ती सेवा मंचच्यावतीने काकडी येथील साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळाला कोपरगाव शहराचे नाव द्यावे, या मागणीसाठी स्वाक्षरी  मोहिम घेतली. या मोहिमेत कोपरगावचे प्रसिद्ध व्यापारी संतोष भट्टड यांनी पहिली स्वाक्षरी केली. मंचचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र जगताप, किशोर चोरगे, किशोर काळे, नानासाहेब  मोरे, शेख राहि अबु उबेदा, नितीन शिंदे, अपक्ष नगरसेवक हाजी मेहमुदभाई सय्यद, आर. टी. जाधव, भाऊसाहेब भालेराव,  आदींनी स्वाक्षरी करून या मोहिमेत भाग घेतला.
 मोहिम राबवली या स्वाक्षरी मोहिमेला सर्व करून नगरध्यक्ष विजयरावजी वहाडणे, उपनगरध्यक्ष विजयराव वाजे, महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी कॉग्रेस प्रदेश सचिव संदीप वर्पे, नगरसेवक  मंदार पहाडे, संदीप पगारे, सुनिल गंगुले, विरेन बोरावके, सतेंद्र मंदडा, नगरसेवक स्वप्निल निखाडे,  माजी नगरध्यक्ष राजेंद्र सोनवणे, राजेंद्र घोडेराव, दिलीप घुमरे, मंगेश औतडे,  चेतन खुबाणी आदींसह असंख्य नागरिकांनी देशभक्ती सेवा मंचच्या या स्वाक्षरी आंदोलनाला पाठिंबा देत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.