तीन दिवस कृषी सेवाकेंद्राचे बंद आंदोलन
अहमदनगर, दि. 2, नोव्हेंबर - यवतमाळ जिल्ह्यातील शेतकर्यांचे चूकीच्या पध्दतीने पीक फवारणी केल्यामुळे मृत्यू झालेले आहेत.अनेक शेतकरी शेतमजूर यामुळे बाधित झाले आहेत या सर्व प्रकाराला कृषी निविष्ठा विक्रेत्यांना जबाबदार धरून त्यांच्या वर होणार्या पोलीस कारवाईचा निषेध म्हणून राज्यासह जामखेड तालुक्यातील सर्व कृषी निविष्ठा विक्रे त्यांनी बंद आंदोलन सुरू केले आहे.
जामखेड तालुक्यातील कृषी सेवा केंद्र चालकांनी तहसीलदार यांना दि 2 ते 4 नोव्हेंबर दरम्यान कृषी साहित्य विक्रीचे दुकाने बंद ठेवण्याबाबत व व्यवसायसंबधित काही मागण्यांचे निवेदन जिल्हा फर्टिलायझर पेस्टीसाईड सीडस डिलर्स जामखेड च्या वतीने देण्यात आले आहे.कृषी निविष्ठा विक्रेत्यांना जवाबदार धरून त्यांच्या वर कृषी विभागाने पोलीस कारवाई सूरू केली आहे.विक्री परवाना रद्द करणे, कधीही येवून विक्री बंद पाडणे, आदी त्रासामुळे व्यवसाय करणे कठीण झाले आहे.असे ही कृषी सेवा केंद्रांच्या मालकांचे म्हणने आहे.
आपल्या निवेदनात म्हटले आहे की ऑनलाईन परवन्यात समाविष्ट केलेले अर्ज ग्राह्य धरण्यात यावेत व परवान्यामध्ये कीटकनाशकांचे उगम प्रमाणापत्र दाखल करण्याकरिता मुदत देण्यात यावी.शासनाने कृषी व पदुम विभागाकडील शासन निर्णया द्वारे बिगर नोंदणीकृत कृषी निविष्ठा परवानाधारक विक्री केंद्रातून विक्रीस प्रतिबंध केला आहे त्यावर सखोल अभ्यास करून योग्य निर्णय घ्यावा.तसेच शासनाकडून सर्व कीटकनाशक उत्पादक कंपन्यांचा त्यांचे उगम प्रमाणपत्र कृषी विक्रेत्यांना देणे बंधनकारक करावे. तसेच कृषी विक्रेत्याक डील बियाणे, कीटकनाशके व खते यांचे हस्तलिखित साठा रजिस्टर एवजी संगणकीय पद्धतीने ठेवण्यात आलेला साठा रजिस्टर ग्राह्य धरण्यात यावे. निवेदन देताना किरण शिंदे, सुनिल चोरडिया, उदय शिंदे, सुरेश महाजन, सूरेश जरे, संतोष पवार, बाळासाहेब खेत्रे, यांच्यासह तालूक्यातील पन्नास ते साठ कृषी सेवा केंद्र चालक उपस्थित होते.