Breaking News

धूमस्टाईलने व्यापाऱ्याचे साडे तीन लाखाची रक्कम पळविली


शिर्डी/प्रतिनिधी :- पोहेगाव येथील भुसार मालाचे व्यापारी बाळासाहेब अण्णासाहेब शिंदे वय ४१ रा.पोहेगाव यांनी २७ नोहेंबर २०१७ रोजी एच.डी.एफ.सी.बँकेमधून ग्राहकांना देण्यासाठी ३ लाख ४५ हजार रु.काढले होते दुसऱ्या दिवशी सर्व व्यवहार करून दुकान बंद केल्यानंतर घरी जात असताना पोहेगाव शिंदेवाडी रोडला मोटरसायकल नं.एम.एच.१७ ३५२३ वरून जात असताना काळ्या रंगाच्या पल्सर वरून असलेल्या तिघांनी बेदम मारहाण व शस्त्रांचा धाक दाखून लुटून नेल्याची फिर्याद बाळासाहेब अण्णासाहेब शिंदे यांनी शिर्डी पोलिसात दिल्यामुळे गुन्हा रजि.नं.१४८ भा.दं.वी.३९४/३४ गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास स.पो.नि.संदीप कहाळे हे करीत आहे.

अधिक माहिती अशी की पोहेगाव ते शिंदेवाडी येथील राहत्या घराकडे जात असताना पाठीमागून हे तिघे आल्यानंतर गाडीला आडवी लावून पैशाची पिशवी हिसकावून जबरीने चोरून नेले त्यात १००, ५०, ५००, व १०च्या नोटांचे बंडल असून या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे गेल्या काही दिवसापासून धूमस्टाईल चोरीत काळ्या रंगाच्या पल्सरचा वापर झालेला आहे वाढती गुन्हेगारी पाहता शिर्डी पोलिसांनी गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली असून परिसरात अनेक दुचाकी वाहने विना नंबर प्लेट फिरत असताना कठोर कारवाई होत नसल्याने अशी अनेक वाहने अनेक तरुण घेऊन फिरत असतात अशा संशयितांवर पोलिसांनी कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे