Breaking News

बीडीओंचा जबाब देण्यास नकार; राष्ट्रवादीची चौकशीची मागणी

जळगाव, दि. 06, नोव्हेंबर - चाळीसगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मधुकर वाघ यांनी आपल्या कार्यालयातच विषारी औषध प्राषण करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यांच्यावर शहरातील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पुढील तपासाठी पोलीस त्याचा जबाब घेण्यासाठी गेले असता प्रकृतीचे कारण देत जबाब देण्यास नकार दिल्याची माहीती पोलिस निरिक्षक रामेश्‍वर गाडे पाटील यांनी दिली.
पंचायत समितीची मासिक सभा सुरू असताना बीडीओ मधुकर वाघ यांनी आपल्या दालणातील स्वच्छतागृहातच विषारी औषध प्राषण करून आत्महत्येचा करण्याचा प्रयत्न केला. होता त्याना तातडीने उपचारासाठी शहरातील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले होते.
सध्यस्थितीत त्यांची प्रकृती स्थिर असून अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद पाटील, पोलीस निरिक्षक रामेश्‍वर गाडे पाटील, तपास अधिकारी उपनिरिक्षक घोळवे दिवसभरात तिन चार वेळा बीडीओ वाघ यांचा जबाब घेण्यासाठी जाऊन आले. वाघ यांनी प्रकृतीचे कारण देत सध्यसिथतीत जबाब देऊ शकत नाही, असे सांगितल्याची माहीती पोलिस निरिक्षक रामेश्‍वर गाडे पाटील यांनी दिली. बीडीओ वाघ बोलण्यास तयार नाहीत. त्यांच्या जबाबानंतर पुढील कारवाई केली जाईल असेही त्यांनी सांगितले. घटनेनंतर सभापती स्मितल बोरसे यांनी आपली भुमिका कळविली. दरम्यान याबाबत एक समिती नेमण्यात आली असून, ती चौकशी समिती सोमवारी अहवाल सदर करणार आहे.
गटविकास अधिकारी मधुकर वाघ यांनी लोकप्रतिनिधी तसेच सत्ताधारी पंचायत समितीचे सदस्य यांच्या मानसिक छळास कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्या घटनेचा समाजातील सर्वच स्तरातून निषेध होत असून या प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली. या आशयाचे पोलिस निरिक्षक रामेश्‍वर गाढे पाटील तसेच तहसिलदार कैलास देवरे यांना निवेदन देण्यात आले.
बीडीओंनी केलेले आरोप चुकीचे आहेत. याप्रकरणाची चौकशी झाल्यानंतर सत्य काय ते समोर येईल. चुकीचे काम झाली तर त्याचा जाब आपण विचारणारच, अशी प्रतिक्रिया आमदार उन्मेश पाटील यांनी दिली आहे.