शिक्षकांच्या 21 संघटनांचा मूकमोर्चा; अडीच ते तीन हजार शिक्षकांच्या सहभाग
जळगाव, दि. 06, नोव्हेंबर - ऑनलाइन कामे बंद करावी, अशैक्षणिक कामांमधून मुक्तता व्हावी, जुनी पेंशन योजना लागू करावी यासह अन्य मागण्यांसाठी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचा आज जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मूकमोर्चा काढण्यात आला.
अडीच ते तीन हजार शिक्षकांच्या सहभाग असलेल्या मोर्चातून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुरूजींचा केला आचारी, पुरे झाली आता लाचारी, शिक्षक झाले ऑनलाईन शिक्षण केले दिशाहिन यासारख्या बॅनर घेवून निषेध नोंदविण्यात आला होता.
जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या मुकमोर्चात शिक्षकांच्या 21 संघटनांचा सहभाग होता. जिल्ह्यातील प्राथमिकच्या तीन हजारापर्यंत शिक्षकांनी यात सहभाग नोंदवून निषेध व्यक्त केला. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानापासून दुपारी एकला मोर्चाला सुरवात झाली. सुरवातीला चाळीसगाव तालुक्यातील ऑनलाईनच्या कामातून आत्महत्या करणारे शिक्षक आबासाहेब चौधरी यांच्यासह ऑनलाईन व पोषण यातून त्रासून आजपर्यंत 50 बळी ठरलेल्या शिक्षकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर मुकमोर्चाला सुरवात झाली. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानापासून मोर्चाला सुरवात होवून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. येथे निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांना महिला शिक्षक पाकीजा पटेल, विद्या पाटील, छाया सोनवणे, संगीता मगर या शिशतमंडळाने निवेदन दिले. शिक्षकांनी केलेल्या मागण्यांमध्ये प्रामुख्याने शाळास्तरावर करण्यात येणारी ऑनलाइन कामे बंद करून केंद्र पातळीवर डेटा ऑपरेटरची नेमणूक करण्यात यावी, शिक्षकांच्या बदल्या व्हाव्यात, परंतु हे होत असताना कोणावरही अन्याय होऊ नये म्हणून 27 फेब्रुवारी 2017 चा शासन निर्णयात दुरुस्ती व्हावी, संगणक अर्हता पास होण्याची मुदत डिसेंबर 2018 अखेर वाढवून मिळावी, नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत दाखल झालेल्या सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, यांचा समावेश आहे.
प्राथमिक शिक्षकांनी काढलेल्या मोर्चाला जळगाव शहरातील भाजपचे आमदार सुरेश भोळे यांनी व शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील यांनी पाठींबा दर्शविला. जिल्हाधिकारी कार्यालयावर आलेल्या मोर्चाच्या ठिकाणी येवून आमदार भोळे व जि.प. सदस्य पाटील यांनी शिक्षकांना पाठींबा दिला. तसेच शिक्षकांच्या मागण्या शासनस्तरावर मांडून शिक्षकांना न्याय देण्यासाठी प्रयत्नशिल राहणार असल्याचे आमदार भोळे यांनी यावेळी सांगितले. तर पाटील यांनी शिक्षकांच्या मागण्या मान्य झाल्या नाही, तर शिक्षकांसाठी शिवसेना यापुढे रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.