Breaking News

श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयातील जैविक कचरा उघड्यावर

                                     

श्रीगोंदा /प्रतिनिधी/ ;- श्रीगोंदा शहरातील ग्रामीण रुग्णालयातून निघणाऱ्या जैविक कचऱ्याची विल्हेवाट न लावल्याने आता ही समस्या उग्रस्वरूप धारण करत आहे . मात्र, हा जैविक कचरा ग्रामीण रु ग्णालयाच्या आवारातच टाकला जात आहे. त्यामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे, याला जबाबदार कोण? असा प्रश्न समोर येत आहे.

श्रीगोंदा शहरातील ग्रामीण रुग्णालयात तयार होणार जैविक कचऱ्याची विल्हेवाट लावली जात नसल्यामुळे, नागरी घनकचरा अधिनियम २००० व जैविक घनकचरा (व्यवस्थापन व हाताळणी ) नियम १९८८ नुसार रु ग्णालयातून निर्माण होणाऱ्या जैविक कचऱ्याची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने लावणे, ही जबाबदारी त्या रुग्णालयाची आहे, त्यासाठी आवश्यक यंत्रणा उभी करण्याची जबाबदारी त्या-त्या रु ग्णालयाची आहे. श्रीगोंदा ग्रामीण रु ग्णालयात निर्माण होणारा कचरा संकलित करून, विल्हेवाट लावण्यासाठी पाठविला जातो, असे असतानाही श्रीगोंदा ग्रामीण रु ग्णालयात गोळा होणारा कचरा हा दवाखान्याच्या आवारातच असलेल्या शवविच्छेदनगृहाच्या बाजूला टाकला जात आहे, त्यामुळे त्या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे. 


त्याचा त्रास रुग्णालयाच्या आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांना होत आहे, त्यांचे आरोग्य धोक्यात आले असून, याला जबाबदार कोण? असा प्रश्न या परिसरातील नागरिक विचारत आहेत. याबाबत नागरिकांनी तक्रार केल्यावर माध्यमांना कळताच, आम्ही आपणास विनंती करतो आम्ही लवकरच या कचऱ्याची विल्हेवाट लावतो मात्र याबाबत वतर्मान पत्रात बातमी देवू नका अशी विनंती रुगणालय प्रशासानाडून करण्यात आली . 

मात्र नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत झाला . तरीही ५ दिवस उलटूनही तो कचरा त्याच ठिकाणी दिसत आहे. त्यावरून जैविक कचऱ्याबाबत उदासीनता दिसत आहे .काही नागरिकांनी तीन दिवसांपूर्वी ग्रामीण रु ग्णालयातील आवाराची पाहणी केली असता , त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जैविक कचरा असल्याचे आल्याचे चित्र स्पष्ट दिसले. त्या ठिकाणी उपस्थित डॉक्टर नर्स यांना हे काय आहे? असा प्रश्न विचारला असता, त्याचे उत्तर तेसुद्धा देऊ शकले नाहीत. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयात सर्व काही आलबेल असल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र यामुळे नागरिकांचे आरॊग्या धोक्यात आले आहे याची प्रशासनाने दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे .

सरकारी रुग्णालयाची ही अवस्था तर खाजगीचे काय ?

श्रीगोंदा तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात ही अवस्था असेल, तर श्रीगोंदा शहरात अनेक खाजगी दवाखाने आहेत त्याचा कचरा टाकतात. आणि त्याची नियमानुसार विल्हेवाट लावली जाते का ? हा सवाल उपस्थित केला जात आहे . सध्या साथीच्या आजाराने तालुक्यात थैमान घातले असून त्यासाठी ग्रामीण रुग्नालयासह खाजगी रुणालये हाऊस फुल्ल झाली आहेत . मात्र जैविक कचरा असा उघड्यावर असल्यामुळे नागरिक रुग्णालयात बरे होण्यासाठी येतात कि आजारी पडण्यासाठी येतात याबाबत नागरीकातून शंका- कुशंका व्यक्त केल्या जात आहे.